Tribal Women Climb Hills for E-KYC Saam
महाराष्ट्र

E-KYCसाठी लाडक्या बहिणींची धडपड, महिलांकडून देशी जुगाड, डोंगरावरील झाडाला फोन लावून..

Tribal Women Climb Hills for E-KYC: नंदुरबारमधील आदिवासी महिलांचा ई- केवायसाठी हटके प्रयत्न. डोंगरावरील झाडाला मोबाईल बांधून प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न.

Bhagyashree Kamble

  • लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचा संघर्ष.

  • ई-केवायसीसाठी आदिवासी महिलांचा हटके प्रयत्न.

  • दुर्गम भागातील परिस्थिती समोर.

सरकारी योजनांचा लाभ घेणं हे शहरी (अर्बन) लोकांसाठी निश्चितच एका क्लिकचं काम असेल. पण दुर्गम , गावातील भागात अजूनही लोकांना शिक्षित व्यक्ती किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन ऑनलाईन कामे कराव्या लागतात. काही आदिवासी किंवा दुर्गम भागात अजूनही प्रगत सुविधा उपलब्ध नाही. सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील आदिवासी पाड्यातही हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. राज्य सरकारने लाडक्या बहिणींना ई- केवायसी करणे भाग असल्याचं सांगितल्यापासून आदिवासी परिसरातील भगिणींची लगबग पहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून लाभार्थी महिलांना १५०० रूपये मिळतात. परंतु ई केवायसी करणे अनिवार्य असल्याचं सरकारने सांगितलं. ई-केवायसी प्रक्रियेसाठी धडगावच्या नर्मदा काठावरील खर्डी खुर्द गावातील महिलांनी देशी जुगाडाचा अवलंब केला आहे. तो जुगाड केलेला पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.

धडगाव तालुक्यातील नर्मदा काठावरील या अतिदुर्गम भागात टॉवर उभा आहे. पण इंटरनेट न चालण्यात जमा आहे. मोबाईलला रेंज नसते. शिवास ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासाठी लाडक्या बहिणींनी थेट सातपुड्याच्या उंच टेकडीवर धाव घेतली.

पण इथेही नेटवर्कचे नखरे सुरूच. सिग्नल सतत खंडित होत असल्याने, या महिलांनी एकदम 'हटके' आयडीया शोधून काढली. त्यांनी आपला स्मार्टफोन टेकडीवरील एका उंच झाडाच्या फांदीला मजबूत दोरीने बांधला. झाडाला मोबाईल बांधून, खाली तासन्तास ऊन-वारा सहन करत, त्या कसाबसा मिळालेला स्थिर सिग्नल पकडून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मोबाईल झाडाला बांधला की थोडं तरी नेटवर्क येतं, पण लाडकी बहीणची वेबसाईट काही सरळ चालत नाही, अशी त्यांची व्यथा आहे. सर्वात मोठी अडचण आहे ती ओटीपीच ई-केवायसीसाठी ओटीपी आवश्यक असतो, पण धीमे सर्व्हर आणि कमजोर नेटवर्कमुळे महिलांना तासन्तास त्याच टेकडीवरील उन्हात बसावे लागत आहे.

हक्काच्या मदतीसाठी, त्या पुन्हा-पुन्हा मोबाईल झाडाला बांधतात. फांदीकडे टक लावून बघतात आणि 'कधी एकदा ओटीपी येतोय', याची आतुरतेने वाट पाहतात. या आदिवासी भगिनींचा संघर्ष सरकारी योजना आणि दुर्गम भागातील वास्तवामधील मोठी दरी स्पष्ट करतो. जिथे डिजिटल इंडिया आणि फाइव्ह-जी ची चर्चा होते, तिथे आजही योजनेचा साधा लाभ घेण्यासाठी महिलांना झाडावर मोबाईल बांधावा लागतो.

परंतु, त्यांची हार न मानण्याची वृत्ती आणि जीवघेणी कसरत करण्याची तयारी हीच खरी प्रेरणा आहे. अडचणी कितीही मोठ्या असल्या, तरी जुगाड करून त्यावर मात करण्याची जिद्द या लाडक्या बहिणींनी दाखवून दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urmila Kanetkar: ती परी असमानीची....; निसर्गरम्य वातावरण आणि उर्मिलाच्या मनमोहक अदा

Maratha Reservation: दोन सप्टेंबरचा GR हा फक्त मराठवाड्यापुरताच; मराठा आरक्षणावर बावनकुळेंचा मोठा खुलासा

Maharashtra Live News Update: मनमाडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शानदार पथ संचालन

Saturday Horoscope: मिथूनसह ५ राशींचे मन अस्वस्थ राहिल! नुकसान होईल, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Pune Tourism : महाराष्ट्रात राहून परदेशाचा अनुभव घ्यायचाय? मग दिवाळीच्या सुट्टीत पुण्याजवळील 'हे' ठिकाण पाहाच

SCROLL FOR NEXT