
मुलीच्या अंत्यसंस्काराला वडिलांनी केक कापला.
५ ऑक्टोबरला अपघाती मृत्यू.
७ ऑक्टोबरला लेकीचा वाढदिवस.
भावनिक व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल.
छत्तीसगडमधील कवर्धा जिल्ह्यातून अत्यंत हृदयस्पर्शी घटना उघडकीस आली आहे. वडिलांनी आपल्या मुलीच्या अंत्यसंस्कार करण्यापूर्वी स्मशानभूमीत केक कापला. त्यांनी मृतदेहाजवळ फुगेही ठेवले होते. केक कापल्यानंतर त्यांनी आपल्या मुलीच्या मृतदेहाजवळ केकचा तुकडा नेला. यावेळी मुलीच्या वडिलांना रडू कोसळलं. उपस्थित कुटुंबियांनी त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला. हे दृश्य पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले.
अदिती भट्टाचार्य (वय वर्ष १०) असे मृत मुलीचे नाव आहे. तिचा ७ ऑक्टोबर रोजी वाढदिवस होता. ५ ऑक्टोबर रोजी कवर्धा येथे अदिती आणि तिच्या आईचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोघींचा मृत्यू झाला. अदितीच्या वडिलांनी ठरवलं होतं की, प्रथम अदितीचा वाढदिवस साजरा केला जाईल. त्यानंतर अदिती आणि तिची आई दोघांचे अंत्यसंस्कार केले जाईल.
इंद्रजित भट्टाचार्य हे मूळचे कोलकात्याचे रहिवासी. अदितीचे वडील आणि त्यांचे कुटुंब कोलकाताहून कवर्धा येथे आले होते. अपघातानंतर मृतदेहांमधून दुर्गंधी येऊ लागली होती. दोन्ही मृतदेहाला कोलकात्यामध्ये नेणं अशक्य होतं. त्यामुळे भट्टाचार्य कुटुंबाने कवर्धा येथेच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी कवर्धा येथील लोहारा रोडवरील मुक्तिधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी वडिलांनी लेकीचा स्मशानभूमीतच वाढदिवस साजरा केला.
मिळालेल्या माहितीनुसार, अदिती आपल्या आईसोबत सहलीसाठी आली होती. अदितीचे वडील कोलकात्यात होते. अदिती आणि तिच्या आईचा अपघात कलघरिया गावाजवळ घडला. भरधाव ट्रकने कोलकाताहून पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला धडक दिली. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात अदिती आणि तिच्या आईचाही मृत्यू झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.