Violent scenes from the tribal protest in Nandurbar: vehicles damaged, police in action. saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Tribal Agitation: आदिवासी मोर्चाला हिंसक वळण; आंदोलनात दगडफेक,वाहनांची तोडफोड

Nandurbar Tribal Agitation Turns Violent: नंदुरबारमध्ये आदिवासी आंदोलकांनी दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली. गोंधळ उडाल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला.

Bharat Jadhav

  • नंदूरबारमधील आदिवासींच्या मोर्चाला हिंसक वळण लागलं.

  • आंदोलकांनी दगडफेक आणि वाहनांची तोडफोड केली.

  • जिल्हाधिकारी कार्यालयातील गाड्यांचे नुकसान झालं.

सागर निकवाडे, साम प्रतिनिधी

नंदूरबारमधील आदिवासींच्या मोर्चाला हिंसक वळण लागलं. आंदोलनात दगडफेक झाल्यानंतर वाहनांची तोडफोड झालीय. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील गाड्यांची तोडफोड केली. त्यानंतर हिंसक आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलीस दलाकडून अश्रूधूरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी आणि आंदोलक जखमी झालेत.

दगडफेकीत पोलीस कर्मचारी आणि काही आंदोलक जखमी झालेत. पूर्ण मोर्चा शांततेत पार पडल्यानंतर काही उपद्रव्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली. बंदोबस्ताला असलेल्या पोलीस आणि उपद्रव्यांमध्ये चकमक घडली. काही उपद्रव्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या.

या दगडफेकीच्या घटनेत एक पोलीस अधिकारी एक पोलीस कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते मालती वळवी देखील जखमी झाल्या आले. आदिवासींचा मूक मोर्चा निघाला होता,आंदोलक निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते त्यावेळी काही उपद्रव्यांनी कार्यालयातील परिसरातील वाहनांची तोडफोड केली पोलिसांवर दगडफेक केली.

का करण्यात आलं आंदोलन?

काही दिवसापूर्वी नंदूरबारमध्ये एका मुलावर चाकू हल्ला झाला होता त्यात त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आदिवासी समाज खूप आक्रमक झाला. या घटनेचा निषेध करत याविरोधात मोर्चा काढला. आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. निवेदन देताना जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या काही उपद्रव्यांनी कार्यालयातील वाहनांची तोडफोड केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकींसाठी ४१० कोटी मंजूर; ऑक्टोबरचा हप्ता कधी येणार? eKYC बाबत घेतला मोठा निर्णय

Maharashtra Live News Update : पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी

High Speed Rail : १९ तासांचा प्रवास फक्त २ तासात, हाय-स्पीड ट्रेनचा मास्टरप्लान नेमका काय?

Chirote Recipe : दिवाळीत बनवा मऊसूत- खुसखुशीत चिरोटे, एक घास खाताच गावाची आठवण येईल

Sonakshi Sinha : कतरिनानंतर सोनाक्षी सिन्हा देणार गुडन्यूज? 'तो' VIDEO पाहून सोशल मीडियावर रंगली प्रेग्नेंसीची चर्चा

SCROLL FOR NEXT