Nagpur third standard student dies after collapsing in school saam tv
महाराष्ट्र

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Class 3rd Student Died: नागपूरच्या जरीपटका भागात शाळेच्या सुट्टीत दरम्यान तिसरीच्या वर्गातील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. शाळा प्रशासनाकडून निष्काळजीपणा झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

Bharat Jadhav

  • नागपूरच्या जरीपटका परिसरातील शाळेत तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

  • दुपारच्या सुट्टीत चक्कर येऊन विद्यार्थी अचानक कोसळला होता.

  • उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

पराग ढोबळे, साम प्रतिनिधी

नागपूरच्या जरीपटका परिसरातील एका शाळेत तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. ही घटना जरीपटका येथील राजकुमार केवलरामाणी हायस्कूलमध्ये घडली. मृत विद्यार्थ्याचे नाव खणीत कटरे आहे. शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केलाय. (Nagpur third standard student dies after collapsing in school)

हाती आलेल्या माहितीनुसार दुपारी शाळेची सुट्टी झाली होती त्यावेळी त्याला शाळेच्या मैदानात खणीत कटरे याला अचानक चक्कर आली, त्यानंतर तो खाली कोसळला. त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती शालेय प्रशासनाने दिलीय.

परंतु मात्र शाळा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केलाय. या दुर्घटनेनंतर शाळेच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांसह नागरिकांकडून केली जात आहे.

आईचा शाळा प्रशासनावर गंभीर आरोप

खणीत कटरेंच्या मृत्यू प्रकरणी मृत मुलाच्या आईने थेट शाळा प्रशासनावर गंभीर आरोप केलेत. खणीत जेव्हा घरून शाळेत गेला होता, त्यावेळी तो खूप चांगला होता. त्याला जेवणाला सांगितलं होतं, त्याने जेवणं केलं. त्यानंतर बिस्कीट खाल्लं. त्यानंतर त्याला मी पैसे दिले. त्याने त्या पैशांचं बिस्कीट पुडाही घेतला.

पण जेव्हा तो शाळेच्या मैदानात पोहोचला. त्याला चक्कर कधी आली त्याला रुग्णालयात कधी दाखल केलं. हे माहिती नाहीये. आम्हाला दुपारच्यावेळी फोन आला. यात काहीतरी घोळ आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका समोर येत नाहीयेत. त्यांनी विचारपूसही केली नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT