नाशिक: नाशिक शहरात एका घटनेने मोठी शोककळा पसरली आहे. नाशिकमधील इंदिरानगर रोडवर एक अपघात झाला आहे. भरधाव वेगाने गाडी चालवल्याने दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा अपघात होऊन निधन झाले आहे. विद्यार्थ्याचे नाव वेदांत गुरसळकर असे आहे.
वेदांत हा वडाळा-पाथर्डी रोडवरील वज्रभूमी रो हाऊसमध्ये राहत होता. वेदांत हा शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास पाथर्डी गावाकडून इंदिरानगरकडे त्याच्या दुचाकीवरून जात होता. वेदांत हा भरधाव वेगाने गाडी चालवत होता. त्यावेळी त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि त्याची दुचाकी थेट शेजारी असलेल्या पाणीपुरीच्या गाडीवर जाऊन आदळली.
प्रसंगी पणीपुरच्या गाडीचा पत्रा वेदांतच्या गळ्याला लागला आणि गळ्यातून रक्तस्त्राव सुरू झाला.स्थानिक नागरिकांनी त्याला जवळील खासगी रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान वेदांतचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताची इंदिरानगर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन मृत्यूची नोंद केली आहे.
वेदांतच्या पश्चात एक लहान भाऊ आणि आई, वडील असा परिवार आहे. वेदांतचे वडील हे राज्य परिवहन महामंडळात कार्यरत आहे. तर आई गृहिणी आहे. वेदांत हा 16 वर्षाचा होता आणि त्याच्याकडे वाहन चालवण्याचे लायसन्स नव्हते.असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच अल्पवयीन मुलांना गाडी चालवण्यास देणे हा देखील गुन्हा आहे असे पोलीस म्हणाले. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहे. तर अल्पवयीन मुलांना गाडी न देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सदर घटनेमुळे वेदांतच्या मित्र परिवारामध्ये आणि नाशिक शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.