समृद्धी महामार्गवर मर्सिडीज कारला भीषण आपघात झाला. या अपघातामध्ये बांधकाम व्यवसायिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुनील गणपतराव हेकरे असं या मृत बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. तर कारमधील तिघे जण गंभीर जखमी झाले. मुंबईवरून कौटुंबिक कार्यक्रम आटपून ते आपल्या घराच्या दिशेने निघाले होते. पण वाटेत त्यांच्यावर काळाने घाला घातला. समृद्धी महामार्गावर कसाऱ्याजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि महामार्गाच्या कडेला कार उलटली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये सुनील हेकरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गांवर आमने ते इगतपुरी दरम्यान मर्सिडीज कारला आपघात झाला. या अपघातात नाशिक येथील व्यावसायिक सुनील गणपतराव हेकरे यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. मुंबईत कौटुंबिक सोहळा आटपून परत जाताना समृद्धी महामार्गावर आमने ते कसारा दरम्यान त्यांची मर्सिडीज कार उलटून झालेल्या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
व्यावसायिक सुनील गणपतराव हेकरे हे मंगळवार २४ जून रोजी सकाळी कुटुंबीयांसमवेत एका कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्ताने मुंबई येथे गेले होते. तिथून परत येताना आमणे ते कसारा दरम्यान त्यांची मर्सिडीज कार उलटली. हेकरे यांच्या कारच्या बाजूने एक कार जात होती. शेजारची कार अतिवेगात गेल्याने हायवेवरील पाणी हेकरेंच्या कारच्या काचेवर उडाले. हेकरे यांची कार त्यांचा मुलगा अभिषेक चालवत होता. कारच्या काचेवर पाणी उडाल्यामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार उलटली.
या अपघातामध्ये सुनील हेकरे यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी सुचेता, मुलगा अभिषेक आणि करण हे तिघे जखमी झाले. सुनील यांच्या पाश्चात त्यांची पत्नी, दोन मुलांसह भाऊ संदीप, अनिल, बहीण छाया असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, मुंबई- नागपूर समृद्धी महामार्ग हा वाहन चालकासाठी धोक्याचा महामार्ग ठरत आहे. १५ दिवसांत आमने ते इगतपुरी दरम्यान १३ आपघात होऊन ४ ते ५ जण मयत झाल्याचे समजते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.