Mumbai Local: 'मुंबई लोकल' मध्ये फुलणार सुंदर प्रेमकथा; ज्ञानदा रामतीर्थकर-प्रथमेश परब यांची फ्रेश जोडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Mumbai Local Marathi Movie: मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल आणि त्यात फुलणारी एक प्रेमकहाणी आता मुंबई लोकल या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे.
Mumbai Local
Mumbai LocalSaam Tv
Published On

Mumbai Local Marathi Movie: मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल आणि त्यात फुलणारी एक प्रेमकहाणी आता मुंबई लोकल या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेता प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर यांची जोडी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून, १ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बिग ब्रेन प्रॉडक्शन्स प्रस्तुत "मुंबई लोकल" या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजित यांनी केलं आहे. बिग ब्रेन प्रॉडक्शन्सचे निलेश राठी आणि आनंदी एंटरटेनमेंटच्या प्राची अग्रवाल, सचिन अग्रवाल आणि तन्वी माहेश्वरी यांनी ‘मुंबई लोकल’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर त्र्यंबक डागा हे सहनिर्माते आहेत. चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र आली असून, मनमीत पेम, पृथ्वीक प्रताप, वनिता खरात, अभिजीत चव्हाण, अनिकेत केळकर, संजय खापरे, संजय कुलकर्णी, स्मिता डोंगरे अशा उत्तम कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Mumbai Local
Robbery in Actor House: या प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी दरोडा? तोडफोड करून मौल्यवान वस्तू चोरल्याचा आरोप

चित्रपटाचे छायांकन योगेश कोळी यांचे असून संकलन स्वप्निल जाधव यांनी केले आहे तर विनोद शिंदे हे असोसिएट डिरेक्टर आणि कलादिग्दर्शक डॉ.सुमित पाटील आहेत. चित्रपटातील गाणी गीतकार अभिजीत कुलकर्णी आणि अभिजीत यांची असून देव अँड आशिष, सुचिर कुलकर्णी व हर्षवर्धन वावरे यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केले आहे तर पार्श्वसंगीत समीर सप्तिसकर यांचे आहे. नृत्यदिग्दर्शक म्हणून राहुल ठोंबरे यांनी काम पाहिले आहे.

Mumbai Local
Kannappa: 'कन्नप्पा'मधील अक्षय कुमारसोबत प्रभासच्या एन्ट्रीचा सीन लीक; सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल

लोकल रेल्वेचं मुंबईमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबई लोकल हे अनेकांचं जणू कुटुंब आहे. लोकल प्रवासात संवाद होतात, वाद होतात, मैत्री होते, तसंच प्रेमही फुलतं. लोकल प्रवासात फुललेली अशीच एक अनोखी प्रेमकहाणी मुंबई लोकल या चित्रपटात पाहता येणार आहे. लोकल रेल्वे काही मराठी चित्रपटांतून दाखवली गेली असली, तरी लोकलमध्ये फुलणारी प्रेमकथा पहिल्यांदाच मराठी चित्रपटात दिसणार आहे. टाइमपास’, ‘टकाटक’, ‘बालक पालक’ असे अनेक यशस्वी चित्रपट केलेला प्रथमेश परब, तर ‘सख्या रे’, ‘जिंदगी नॉट आऊट’, ‘शतदा प्रेम करावे’, ‘ठिपक्यांची रांगोळी’ अशा मालिका, धुरळासारख्या चित्रपटात चमकलेली ज्ञानदा रामतीर्थकर प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. "मुंबई लोकल"चा एक अनुभव मोठ्या पडद्यावर १ ऑगस्टपासून घ्यावाच लागणार आहे यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com