Robbery in Actor House: या प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी दरोडा? तोडफोड करून मौल्यवान वस्तू चोरल्याचा आरोप

Robbery in Brad Pitt House: अलिकडेच हॉलिवूड स्टार ब्रॅड पिटच्या घरात चोरीची घटना घडली आहे. मात्र, पोलिस अजूनही या घटनेची चौकशी करत आहेत. जाणून घेऊयात संपूर्ण घटना.
Robbery in Brad Pitt House
Robbery in Brad Pitt HouseSaam Tv
Published On

Robbery in Actor House: हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पिट सध्या शुक्रवारी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या त्याच्या 'F1' चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता वृत्तानुसार, काही संशयितांनी लॉस एंजेलिसमधील ब्रॅड पिटच्या घरात तोडफोड केली आणि सामान घेऊन पळून गेल्याचे उघड झाले आहे. जाणून घेऊयात संपूर्ण घटना.

पोलिसांनी चोरीची माहिती केली

लॉस एंजेलिसच्या लॉस फेलिझ परिसरातील नॉर्थ एजमोंट स्ट्रीटच्या २३०० ब्लॉकमध्ये बुधवारी चोरी झाल्याची माहिती लॉस एंजेलिस पोलिस विभागाने केली. यासोबतच, पोलिस अधिकारी ड्रेक मॅडिसन यांनी सांगितले की तीन संशयितांनी घराच्या पुढच्या खिडकीतून घरात प्रवेश केला, तोडफोड केली आणि सामान घेऊन पळून गेले. चोरी झालेल्या वस्तूंबद्दल अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही, त्याची चौकशी केली जात आहे. तसेच, चोरीची बातमी पहिल्यांदा गुरुवारी एनबीसी न्यूजने दिली होती.

Robbery in Brad Pitt House
Gadi Number 1760: वय कितीही असो...; 'गाडी नंबर १७६०'मध्ये ७७ वर्षीय सुहास जोशींनी साकारला जबरदस्त ॲक्शन सीन्स

ब्रॅड पिट घरात नव्हता

पोलिस अधिकाऱ्याने म्हटले आहे की घराचा मालक कोण होता किंवा घरात कोण राहत होते याबद्दल कोणतीही माहिती नाही. पण रिपोर्ट्सनुसार, ही चोरी ब्रॅड पिटच्या घरी झाल्याचे म्हटले जात आहे. सध्या हा अभिनेता त्याच्या घरी उपस्थित नाही, कारण तो त्याच्या 'F1' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी देशाबाहेर गेला आहे.

Robbery in Brad Pitt House
Nauvari Saree: नऊवारी साडी तुम्हालाही नेसता येत नाही का? मग जाणून घ्या 'ही' सोपी पद्धत

चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित

जोसेफ कोसिन्स्की दिग्दर्शित 'F1' मध्ये ब्रॅड पिटसोबत डॅमसन इद्रिस मुख्य भूमिकेत दिसला आहे. मॅक्स व्हर्स्टापेन, फर्नांडो अलोन्सो, लुईस हॅमिल्टन, कार्लोस सेन्झ, एस्टेबन ओकॉन, जॉर्ज रसेल, लान्स स्ट्रोल, लँडो नॉरिस आणि चार्ल्स लेक्लेर्क यांच्यासह अनेक फॉर्म्युला 1 स्टार या चित्रपटात कॅमिओ करताना दिसले आहेत. हा चित्रपट आज म्हणजेच 27 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com