Shruti Vilas Kadam
नऊवारी साडी 8-9 मीटर लांब असते. साडी हलकी आणि सॉफ्ट कॉटन किंवा सिल्कची असावी, ज्याने फोल्ड्स नीट बसतील.
नऊवारी साडी ही पारंपरिक शैलीत धोतीसारखी नेसली जाते, म्हणून आतून फिटिंग गुडघ्यापर्यंत पॅन्ट (लेगिंग्स) वापरणे सोयीचे ठरते.
साडीचा एक टोक पाठीमागून समोर आणा आणि उजव्या बाजूला खोचून कमरभोवती एक फेरा द्या.
साडीचा मधला भाग समोरून घेऊन 5-7 सुंदर कळ्या (pleats) पाडा आणि त्या कमरेवर खोचाव्यात.
मागच्या बाजूला साडीचे दोन्ही टोक दोन्ही पायांतून पुढे आणा आणि छानशी V-शेप देऊन खोचा.
उरलेला साडीचा भाग म्हणजेच पल्ला, डाव्या खांद्यावरून घेतला जातो. तो कंबरेवर खोचावा किंवा पिन लावून सजवावा.
साडी व्यवस्थित बसली आहे ना हे आरशात बघा. पिन्स लावून घट्ट करा आणि पारंपरिक दागिने घालून लुक पूर्ण करा.