अहिल्यानगरमध्ये भीषण अपघात
नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांच्या कारचा अपघात
अपघातात एकाची प्रकृती चिंताजनक
सुशील थोरात, साम टीव्ही
राज्यात अपघाताची मालिका सुरू आहे. अहिल्यानगरच्या जामखेड-कर्जत रोडवर फिरायला निघालेल्या नववी दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थी मित्रांची चारचाकी उलटल्याची घटना घडली आहे. चारचाकी वाहनातील ७ तरुण विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
अहिल्यानगरमधील विद्यार्थी जामखेडवरून अकलूज वॉटर पार्कला जाताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर कारने एक ते दोन वेळा उलटली. या कारमधील सर्व विद्यार्थी हे नववी आणि दहावीतील मित्र असल्याची माहिती हाती आली आहे. अपघात घडल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी सर्वांना गाडीतून बाहेर काढले. जखमींवर जामखेड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कार उलटल्याने भीषण अपघात झाला. विद्यार्थ्यांच्या कारचा चेंदामेंदा झाला आहे. अपघातामुळे कारचे प्रचंड नुकसान झालं आहे. अपघातामधील विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून विद्यार्थ्यांचे कुटुंबीय पोहोचले आहेत.
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता विराज जगताप याचा बदलापुरात अपघात झालाय. रस्ते अपघातात विराजच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. स्पीड ब्रेकरवर पट्टे नसल्यानं अपघात झाल्याचा आरोप विराजने केलाय. विराज हा 24 मार्च रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास मित्राच्या घरून परतत होता. आदर्श शाळेसमोर रस्त्यावर नव्याने तयार केलेला स्पीड ब्रेकर त्याला अंधारामुळे दिसला नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.