Jeera Rice Recipe : जीरा राईस नेहमी चिकट होतो? ही ट्रिक फॉलो, फक्त 15 मिनिटांत तयार होईल डीश

Sakshi Sunil Jadhav

जीरा राइस रेसिपी

घरच्या घरी अगदी हॉटेलसारखा सुगंधी, मोकळा आणि परफेक्ट जीरा राईस बनवायला खूप सोपा आहे. पुढे याची स्टेप बाय स्टेप रेसिपी आपण जाणून घेणार आहोत.

Hotel Style Jeera Rice

साहित्य

1 कप बासमती तांदूळ, 2 कप पाणी, 2 टेबलस्पून तूप, 1 टीस्पून जिरे, 1 तमालपत्र, 2 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा, मीठ, कोथिंबीर इ.

Hotel Style Jeera Rice

स्टेप १

जीरा राईस मोकळा बनवण्यासाठी बासमती तांदूळ कमीत कमी 20 ते 30 मिनिटं पाण्यात भिजवून ठेवा. त्यामुळे तांदळाचे फुटतात.

Cumin Rice

स्टेप २

तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. मग त्यातला स्टार्च काढून टाका. त्याने भात चिकट होत नाही.

Basmati Rice Recipe

स्टेप ३

कढई किंवा जाड बुडाच्या भांड्यात तूप गरम करा. त्यात जिरं टाका. जिरं तडतडलं की, त्यात तमालपत्र, लवंग आणि दालचिनी घालून काही सेकंद परतून घ्या.

Basmati Rice Recipe

स्टेप ४

भिजवलेले तांदूळ निथळून कढईत घाला. 2 ते 3 मिनिटं हलक्या हाताने ते परतून घ्या. एक कप तांदळासाठी दोन कप पाणी घाला. त्यात चवीनुसार मीठ मिक्स करा.

Basmati Rice Recipe

स्टेप ५

भांडे झाकून मध्यम आचेवर 10 ते 12 मिनिटं भात शिजू द्या. पाणी पूर्ण आटल्यावर गॅस बंद करा. गॅस बंद केल्यानंतर भात 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवा आणि सर्व्ह करा.

Jeera Rice Recipe

NEXT: नॅच्युरली गुलाबी ओठ हवेत? मग झोपण्याआधी लावा हे २ पदार्थ अन् पाहा चमत्कार

naturally pink lips | google
येथे क्लिक करा