

नाशिकच्या येवला तालुक्यातील सावरगाव येथे आदिवासी बांधवाच्या जागेवर बेकायदेशीर घरकुल बांधकाम केल्या प्रकरणी गेल्या 2 दिवसापासून येवला तहसिल कार्यालयावर नवनाथ लोखंडे व त्यांच्या पत्नीने आमरण उपोषण सुरू केले आहे. एकलव्य संघटना यात सहभागी झाली आहे. आज संध्याकाळच्या सुमारास येवला शहर आणि परिसरात झालेल्या वादळी वारा, जोरदार पावसात सुद्धा हे कुटुंब आहे त्याच ठिकाणी वादळ,पाऊस अंगावर झेलत न्यायासाठी त्याच ठिकाणी बसून राहिले आहे.
सावदा शहरासह परिसरात मुसळधार पावसाची हजेरी आहे. काही भागांत गारपीड सावदा शहर आणि परिसरात सायंकाळी जोरदार पाऊस कोसळला. काही ठिकाणी गारपीड झाल्याने शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे.
छत्रपती संभाजीनगर - पैठण तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी
वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील शेकडो घरांवरील पत्रे उडाली. डाळिंब,आंबा, मोसंबी आणि केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान.
दादेगाव हजारे, हर्षी, कुतुबखेडा, लिंबगाव, पाचोड, थेरगाव , कौदर,दावरवाडी येथे मोठ्या प्रमाणात फळबागांचे नुकसान
सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, जनजीवन विस्कळीत
सातारा जिल्ह्यात आज अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घालत जनजीवन विस्कळीत केले.
दुपारनंतर अचानक बदललेल्या हवामानामुळे जिल्ह्याच्या विविध भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट अनुभवायला मिळाला.
वाई तालुक्यातील भुईंज, जोशीविहीर परिसरात पावसाच्या तुफान बॅटिंगमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.
तर अनेक ठिकाणी झाडे व फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या.
दुसरीकडे पुणे–सातारा राष्ट्रीय महामार्गावरील रायगाव फाटा परिसरात सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने एक कार पाण्यात अडकून पडली.
पुणे -
शरद पवार उद्या बारामतीत
शरद पवार नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्याची शक्यता
कोल्हापूरचा दौरा संपल्यावर शरद पवार उद्या बारामती मध्ये मुक्कामी
दुपारी ३ नंतर बारामती मधील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्याची शक्यता
शुक्रवारी बारामती मध्ये अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे झाले होत नुकसान
आज दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे . या दुर्घटनेत एकूण पाच जण जखमी झाले असून यात एक एपीआय, महिला पोलिस, आणि एक MSF यांचा समावेश आहे
हुंडई कंपनीची व्हेन्यू कार विरारहून नालासोपाऱ्याकडे जात होती, तर हुंडई आय-20 कार नालासोपाऱ्याच्या दिशेने वळत होती. याच दरम्यान दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली.
व्हेन्यू कारमधील अर्नाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) निलेश पोर्बे आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे संभाजी लोंडे, महिला पोलीस सुनिता देवरे हे तिघेजण जखमी आहेत यांना किरकोळ दुखापत झाली.
सर्व जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच नालासोपारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
सिंदखेडराजा शहरातील बसस्थानकासमोर भरदिवसा एका गौरक्षकाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे.. गोशाळा सम्मान अभियानाचे महाराष्ट्र प्रभारी म्हणून कार्यरत असलेल्या गौरक्षकाने जनावरांची वाहतूक होत असल्याच्या संशयावरून गाडी अडवल्याने वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे... या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी व्हिडिओची सत्यता तपासून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे....
वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील शेकडो घरांवरील पत्रे उडाली. डाळिंब,आंबा, मोसंबी आणि केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान.
दादेगाव हजारे, हर्षी, कुतुबखेडा, लिंबगाव, पाचोड, थेरगाव , कौदर,दावरवाडी येथे मोठ्या प्रमाणात फळबागांचे नुकसान
मोठा अनर्थ टळला समोरून येणाऱ्या गाड्या अपघातातून वाचल्या
दारूच्या नशेत गाडी चालवल्याने ट्रक पलटी
मध्य धुंद ट्रक चालकासोबत आणखी एक व्यक्ती होती
ट्रकचालक गंभीर जखमी
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहर व परिसरात आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या सुसाट वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून रस्त्यावर कोसळली असून त्यामुळे काही भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. वादळी वाऱ्याचा वेग अधिक असल्याने काही ठिकाणी घरांवरील पत्रे व छपरे उडून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही... वादळी पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे शेगाव परिसरातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाले होते..
अकोला जिल्ह्यात आज सायंकाळी जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. शहरासह ग्रामीण भागात वादळी वातावरण निर्माण झाले असून आज आणि उद्या काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. या वादळी वाऱ्यामुळे ग्रामीण भागातील अनेक केळी बागा जमीनदोस्त झाल्या. यापूर्वीच्या नुकसानीतून शेतकरी सावरत असतानाच पुन्हा फटका बसला असून तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
यवतमाळ जिल्हाधिकाळऱ्यांची वाळू साठ्यावर कारवाई
अवैध वाळू साठ्यावरून अधिकाऱ्यांचा जागेवरच घेतला क्लास
बाभुळगांव तालुक्यातील तांबा वाळू घाटावर अचानक कारवाई,वाळू तस्कारांचे धाबे दणाणले
जिल्हाधिकारी विकास मिना यांच्या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये उडाली खळबळ
नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन करून साठवून ठेवलेली वाळू जप्त
यवतमाळच्या बाभुळगांव तालुक्यातील तांबा येथे जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. दोडामार्गनंतर कणकवली तालुक्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. फोंडाघाट आणि हुमरठ परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे काही ठिकाणी वीज पुरवठाही खंडित झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील इतर भागांमध्ये मात्र ढगाळ वातावरण कायम असून नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. मान्सूनच्या पुढील हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यांतील दुर्गम पाड्यांवर हंडाभर पाण्यासाठी महिलांची होणारी जीवघेणी पायपीट साम टीव्ही ने दाखवली होती. सातपुड्याच्या दुर्गम भागातून डोंगरदऱ्यांमधून पाण्याचे जड हंडे वाहून आणावे लागत असल्याने येथील महिलांना गर्भाशय खाली येणे आणि गर्भपातासारखे गंभीर आजार होत होते .साम टीव्हीच्या या विशेष बातमीनंतर नंदुरबार जिल्हा प्रशासनाने तातडीने गंभीर दखल घेतली आहे.अक्कलकुवा तालुक्यातील खडकापाणी गावात तात्काळ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू केला आहे.
कल्याण-कसारा दरम्यान वायर हेड तुटल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे.
जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारताच्या आर्थिक वाढीला गती देण्यावर चर्चा झाली
‘ईज ऑफ लिव्हिंग’ आणि ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ सुधारण्यासाठी विविध सुधारणा उपायांचा आढावा घेण्यात आला
पश्चिम आशियातील संघर्षाचा भारत व जगावर होणाऱ्या परिणामांचे मूल्यांकन सदस्यांनी सादर केले.
धर्मेंद्र प्रधान जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत साखळी आंदोलन तर शनिवारी चालू राहणार आहे. आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत राजीनामा दिला नाही तर पुढच्या शनिवारी पुन्हा आंदोलन करणार अशी माहितीसमोर आली आहे.
मालनगाव धरणातून काननदी किनारी असलेल्या 17 गावांना पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे या मागणीसाठी मालनगाव धारणामध्ये काँग्रेसच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले आहे.
नंदुरबारमध्ये नवऱ्याची डोंगरावरून वरात काढण्यात आली. रस्ता नसल्याने चक्क डोंगरावरून नवरदेवाची वरात काढावी लागली. अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम खुर्चीमाळ गावातील हा प्रकार आहे.
विजय वेड्डेटीवार यांचा विधानाबाबत मला माहित नाही मात्र विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपने दहशतीचा वापर केलेला आहे. भाजपची ये ना ते प्रकारे सत्ता मिळवण्याची नीती असून त्यासाठी कुठलाही गैरप्रकारचा वापर करायचा त्यांची नीती आहे.
सरकारचं आणि जरांगेचं सेटलमेंट, राज्य सरकारनेच ओबीसींच अस्तित्व संपवण्यासाठी डाव टाकला
ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आक्रमक...
मराठा समाजासाठी लागू असलेल्या योजना ओबीसी समाजासाठी लागू करा असं नवनाथ वाघमारे म्हणाले ..
मराठा समाजातील मंत्र्यांकडून ओबीसी मंत्र्यांनी आदर्श घ्यायला पाहिजे...
ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळे कुठ लपून बसले आम्हाला कळायला मार्ग नाही, घराच्या बाहेर येऊन ओबीसींच्या हक्कासाठी बोला ....
- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली स्थगितीची घोषणा
- या कायदा विरोधात अनेक देवस्थानच्या समितीने विरोध दर्शविला होता
- तसेच हिंदुत्ववादी संघटनांकडूनही राज्यात अनेक ठिकाणी विरोध करण्यात आला होता
- देवस्थानांच्या जमिनीसाठी नवा कायदा आणला जाईल
- नवा कायद्याच्या प्रारूपासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार
- महसूल विभागाचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेत दोन विभागीय आयुक्त, दोन जिल्हाधिकारी आणि मंदिर संस्थांचे 15 प्रतिनिधी या समितीत असतील
- नव्या कायद्याचा प्रारूपासाठी 15 ऑगस्ट पर्यंत सूचना आणि हरकती मागवण्यात येतील
- 15 सप्टेंबर पर्यंत कायदा तयार करून हिवाळी अधिवेशनात सभागृहात हा कायदा
लातूरच्या निलंगा तालुक्यातील मुदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात चक्क रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोग्य केंद्रात कालबाह्य औषधांचा साठा आणि मुदत संपलेली वैद्यकीय साहित्य आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही कालबाह्य औषधे रुग्णांना दिली जात होती का ? असा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जात आहे
- थेट बाजारसमितीतून कांदा खरेदीसाठी येत असलेल्या तांत्रिक अडचणी प्रशासनानं सोडवल्या
- साम टीव्हीने थेट बाजारसमितीतून कांदा खरेदीसाठी नाफेड आणि NCCF ला येत असलेल्या तांत्रिक अडचणींचा मुद्दा लावून धरल्यानंतर सुधारणा
- नाफेड आणि NCCF ने कांदा खरेदीसाठी नियुक्त केलेल्या सहकारी संस्थांना बाजारसमितीतून थेट खरेदीसाठी व्यापारी परवाने देणार
- सोमवारपासून थेट बाजारसमितीतून नाफेड आणि NCCF ने कांदा खरेदी सुरू करण्याचं नियोजन
नीट पेपर फुटी प्रकरणात आरसीसी क्लासचा संचालक शिवराज मोठेगावकर याला सीबीआय ने ताब्यात घेत कारवाई केल्यानंतर, लातूर येथील आरसीसी क्लास पुन्हा सुरू झाला आहे, मात्र हा क्लास तात्काळ बंद करा अशी मागणी करण्यात येते, काही राजकीय संघटनांकडून आरसीसी क्लास बाहेर जोरदार निदर्शने करण्यात आले आहे
- कांद्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात
- नाफेडच्या कांदा खरेदीतील अडचणी सोडवण्यासाठी बैठकीत चर्चा
- नाफेडने थेट बाजारसमितीतून कांदा खरेदी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पुढाकार
दिवसेंदिवस वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.सततच्या इंधन दरवाढीने हैरान झालेल्या नागरिकांनी आता पेट्रोलवरील खर्चाला फाटा देत इलेक्ट्रिक वाहनांचा स्वस्त आणि प्रदूषणमुक्त पर्याय निवडण्यास पसंती दिली आहे.परिणामी,पारंपरिक वाहनांऐवजी इलेक्ट्रिक मोटरसायकलींच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली असून,ई-बाईक्सच्या खरेदीत थेट दीडपटीने वाढ नोंदवली गेली आहे.
जंतरमंतरवर कॉकरोच जनता पक्षाचं आंदोलन सुरू, अभिजीत दिपकेही उपस्थित, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी
कडगावमध्ये घर कोसळून महिलेचा मृत्यू, पत्र्याचा जबर मार लागल्याने समाबाई शिरसाट यांचा मृत्यू पाच ते सहा जण जखमी शेतकरी कुटुंबाचे मोठे नुकसान झालंय.
वादळी पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे घराची पडझड होऊन ७५ वर्षीय एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत कुटुंबातील पाच ते सहा जण जखमी झाले आहेत.
वाशिम शहरातील सिव्हिल लाईन परिसरात मोठ्या प्रमाणात राहणाऱ्या शासकीय निवासातील कर्मचाऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे... सार्वजनिक बांधकाम विभागाने चार महिन्यापूर्वीच या पाईपलाईनचे नवीन काम केले होते.मात्र ही पाईपलाईन मोठ्या प्रमाणात फुटल्याने पाण्याची नासाडी होत आहे..चार यापूर्वीच नवीन काम करूनही मोठ्या प्रमाणात पाईपलाईन फुटल्याने निकृष्ट काम केल्याचा आरोप केला जातोय...एकीकडे वाशिम शहराला आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना निकृष्ट कामामुळे नाहक शासकीय कर्मचाऱ्यांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे..
कॅन्सर हॉस्पिटलवर सायबर हल्ला झाला आहे.
दिल्लीच्या रस्त्यावर युवक उतरलेले पाहायला मिळतात जंतर-मंतर या ठिकाणी युवकांनी झुरळाचे मास्क लावून आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला आहे. तर काही युवकांनी युवक कशा पद्धतीने बुडत आहे. या संदर्भातले चित्र काढलेले पाहायला मिळते. या चित्रातून सर्व परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न या युवतीने केला आहे.
शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज पुण्यातील लाल महाला मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवराज्यभिषेक दीन सोहळा लाल महाल येथे साजरा करण्यात येत आहे. यावेळी लाल महाल येथे आकर्षक फुलाची सजावट करण्यात आली आहे.
काळ हा मोठा शिक्षक असल्याचं स्टेस्टस
ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर काल देखील बाळ माने यांनी ठेवलं होतं स्टेटस
बाळ माने यांच्या स्टेस्टसचा रोख कुणाकडे याची चर्चा
काल बाळ माने यांच्याकडून विनायक राऊत यांच्यावरती झाले होते आरोप
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अनावरण सोहळा पार पडत आहे
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण केलं जाणार आहे
आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक
सोहळा राज्यात पार पडत आहे
त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे
गोकुळ गीते अद्यापही निवडणूक लढण्यावर ठाम
काल दिवसभर गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्याकडून गोकुळ गीते यांच्या मन धरणीचा प्रयत्न
मात्र गोकुळ गीते यांनी दोन्ही नेत्यांची भेट टाळली
लवकरच तोडगा काढून, उदय सामंत यांना विश्वास
स्थानिक गुन्हे शाखेची बोरामणी परिसरात मोठी कारवाई
७ लाख ५५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
गांजासह दोन मोबाईल फोन पोलिसांच्या ताब्यात
हैदराबाद–सोलापूर महामार्गावरील हॉटेल वैष्णवी परिसरात सापळा
गोपनीय माहितीच्या आधारे एलसीबी पथकाची धडक कारवाई
माजी आमदार वैभव नाईकांच्या मालमत्तेची एसीबीकडून चौकशी करण्यात येत आहे.
कॉकरच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके भारतात दाखल
अभिजित दिपके यांना दिल्लीत आंदोलन करण्याची परवानगी मिळाली
दिल्लीत करणार आंदोलन
शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागणार
* सिंहस्थ कुंभमेळ्यातील साधुग्राम प्रकल्पासाठी मोठा निधी मंजूर
* तपोवन परिसरातील साधुग्राम उभारणीसाठी १९१.२१ एकर जमिनीच्या भूसंपादनाला मिळणार गती
* राज्य शासनाकडून भूसंपादनासाठी २,२८७ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी
* कुंभमेळ्यात येणाऱ्या लाखो भाविक आणि साधू-महंतांच्या सुविधांसाठी महत्त्वाचा निर्णय
कणकवली तालुक्यातील कलमठ येथील मंथन उकर्डे याने हॉंगकॉंग येथे झालेल्या आशियाई ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपमध्ये 6वे स्थान पटकावले आहे. या स्पर्धेसाठी प्रत्येक वयोगटातून देशभरातून 2 खेळाडूंची निवड झाली होती. 12 वर्ष गटातून भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या मंथनने आशियाई देशांच्या खेळाडूंमध्ये 6वा क्रमांक मिळवला. चेन्नई येथे एप्रिलमध्ये झालेल्या निवड चाचणीत मिनी एज ग्रुप 12 वर्ष गटात मंथनने प्रथम क्रमांक मिळवला होता. फेब्रुवारीत स्टेट चॅम्पियनशिपचे गोल्ड मेडलही त्याने जिंकले आहे.
पुण्यात महिला पोलिस अधिकाऱ्याला निरोप देताना कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावले
या बदलीमध्ये वाहतूक शाखेच्या पोलिस निरीक्षक रुणाल मुल्ला यांची बदली करण्यात आली.
त्यांची डेक्कन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदी नेमणूक करण्यात आली.
* TCS प्रकरणातील ९ खटल्यांची सुनावणी येत्या मंगळवारपासून सुरू होणार
* धर्मांतर, बलात्कार, विनयभंग आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांवर सुरू होणार सुनावणी
* नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात खटल्यांचे कामकाज सुरू होणार
कॉकरच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके भारतात दाखल
दिल्लीत करणार आंदोलन
शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागणार
वसमत मध्ये कोसळला मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस
घरावरील लोखंडी पत्रे थेट रोहित्रावर अडकली
नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरण
तीन अल्पवयीन मुलांसह ३५ साक्षीदारांची साक्ष नोंद
या तिन्ही मुलांनी निर्भीडपणे न्यायालयासमोर साक्ष देत आरोपी चिमुरडीला घटनास्थळाकडे घेऊन जात असल्याचे सांगितले
चिमुरडीला मदत करण्याच्या उद्देशाने त्यांनी शेडवर दगड मारल्याचेही साक्षीत नमूद
सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला पावसाने झोडपले...
कुकुडवाड परिसरात पावसाची जोरदार हजेरी...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना सरकारनं लागू केली आहे. परंतु योजनेतील जाचक अटींमुळे यवतमाळमधील शेतकरी योजनेस अपात्र ठरत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.