Thepla Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट घरी बनवा खमंग आणि स्वादिष्ट थेपला, नोट करा रेसिपी

Shruti Vilas Kadam

थेपल्यासाठी लागणारे साहित्य

गव्हाचे पीठ, बारीक चिरलेली मेथी, दही, हळद, तिखट, धणे-जिरे पूड, मीठ, तेल आणि आवश्यकतेनुसार पाणी घ्या.

Thepla Recipe

पीठ मळण्याची योग्य पद्धत

सर्व साहित्य एकत्र करून मऊसर पीठ मळा. पीठ 10-15 मिनिटे झाकून ठेवल्यास थेपले अधिक मऊ होतात.

Thepla Recipe

थेपले लाटताना घ्यायची काळजी

पिठाचे छोटे गोळे करून पातळ आणि गोल आकारात लाटा. जास्त जाड थेपले केल्यास ते नीट भाजले जात नाहीत.

Thepla Recipe

तव्यावर भाजण्याची प्रक्रिया

गरम तव्यावर थेपला दोन्ही बाजूंनी भाजा. थोडे तेल लावून सोनेरी रंग येईपर्यंत शेकून घ्या.

Thepla Recipe

थेपल्याचे आरोग्यदायी फायदे

मेथीमुळे फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. त्यामुळे थेपला पचनासाठी चांगला आणि पौष्टिक आहार ठरतो.

Thepla Recipe | yandex

थेपल्यासोबत काय सर्व्ह करावे?

लोणचे, दही, चटणी किंवा चहासोबत थेपला खूप स्वादिष्ट लागतो. प्रवासातही तो सहज टिकतो.

Thepla Recipe | yandex

थेपले अधिक मऊ ठेवण्यासाठी टिप्स

पीठात दही आणि थोडे तेल वापरा. तयार थेपले स्वच्छ कापडात गुंडाळून ठेवल्यास ते जास्त वेळ मऊ राहतात.

Thepla Recipe | GOOGLE

Podi Idli Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी पोडी इडली, वाचा सोपी रेसिपी

Podi Idli Recipe
येथे क्लिक करा