Sangali News Saam Tv
महाराष्ट्र

Sangali Accident : दुधाने भरलेला टँकर पलटी होऊन भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

Sangali News : सांगली जिल्ह्यात भिलवडी स्टेशनजवळ दूध वाहतूक करणारा टँकर पलटी होऊन दोन जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या अपघाताचा तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • सांगली जिल्ह्यात दूध वाहतूक करणारा टँकर पलटी झाला.

  • या अपघातात चालक व साथीदारचा मृत्यू झाला आहे.

  • या अपघातात गावातील दोन घरांच्या शौचालयाचेही नुकसान केले.

  • याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

विजय पाटील, सांगली

सांगली जिल्ह्यात भीषण अपघात घडला आहे. पलूस तालुक्यातील भिलवडी स्टेशन जवळील चेंडगे मळा खंडोबाचीवाडी येथील बस थांब्यासमोर दुधाने भरलेल्या टँकरच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने टँकर पलटी झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. सदर घटना काल म्हणजेच मंगळवारी सकाळी घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगली येथील सुशील गोरवाडे यांच्या टँकर क्रमांक एम एच दहा झेड ९००० या दूध वाहतूक करणाऱ्या टँकरवर प्रशांत दिलीप देवकुळे हा दोन वर्षापासून चालक म्हणून काम करीत होता. सोमवार दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी प्रशांत व त्याच्या आत्याचा मुलगा तेजस सुशील भोरे याच्यासह सरूड वडगाव ता.शिराळा येथील समाधान दुध डेअरी येथून दूध घेऊन, भिलवडी स्टेशन येथील चितळे डेअरीकडे येत असताना मंगळवार दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास भिलवडी स्टेशन नजीक असणाऱ्या चेंडगे मळा खंडोबाचीवाडी येथील बस थांब्याजवळ आले.

यादरम्यान चालकाचा टँकर वरील ताबा सुटल्याने, टँकर रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाला. यामध्ये प्रशांत देवकुळे व तेजस भोरे हे दोघेही टँकरच्या केबिनमध्ये अडकून गंभीर जखमी झाले. या अपघातामध्ये टँकर केबिनचा अक्षरशः चक्काचूर झाला. त्याचबरोबर हा टँकर येथील गावातील वस्तीतील दोन कुटुंबाच्या शौचालयावरती आदळल्याने त्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

सुदैवाने बाजूच्या गावात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच क्रेनच्या सहाय्याने टँकर बाहेर काढून,नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना तातडीने भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. मात्र तो दिवस त्या दोघांसाठी अखेरचा ठरला. तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी संबंधित जखमी मृत झाल्याचे सांगितले.

यावेळी घटनास्थळावरती लोकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. सदर घटनेची फिर्याद मयत टँकर चालक प्रशांत देवकुळे याचे वडील दिलीप जयवंत देवकुळे यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात दिली आहे. सदर घटनेचा अधिक तपास भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे हे करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Rain : गेवराई तालुक्यात ऊस पिकाचे अतोनात नुकसान; मदत वाढवून देण्याची मागणी

Maharashtra Live News Update: सोलापूर - विजयपूर राष्ट्रीय महामार्ग वाहतूकसाठी बंद, हत्तूर पूल पूर्णतः पाण्याखाली गेला

Cholesterol Control Tips: गोळ्या, औषधं घ्यायची गरजच नाही! ५ उपाय करतील कोलेस्ट्रॉल कमी, तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं?

Kanya Pujan 2025: नवरात्रीच्या आठव्या किंवा नवव्या दिवशी कन्या पूजा का करतात?

'या' चुकांमुळे तुमच्या मोबाईलचा कधीही होऊ शकतो स्फोट

SCROLL FOR NEXT