Pandharpur News  Saam Tv
महाराष्ट्र

Pandharpur: विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर गाठलं, चंद्रभागा नदीत स्नान करताना अनर्थ घडला, ३ महिलांचा बुडून मृत्यू

Pandharpur News: पंढरपुरमध्ये चंद्रभागा नदीत स्नान करत असताना तीन महिला भाविक बुडाल्या. या मधील दोघींचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. तर तिसऱ्या महिलेचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे पंढरपुरमध्ये खळबळ उडाली.

Priya More

भरत नागणे, पंढरपूर

आषाढी वारीनंतर पंढरपुरमध्ये विठूरायाच्या दर्शनासाठी आलेल्या ३ महिला भाविक चंद्रभागा नदीमध्ये बुडाल्याची घटना घडली. चंद्रभागा नदी पात्रात स्नान करत असताना मोठा अनर्थ घडला. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ३ महिला भाविक नदीत बुडाल्या. दोन महिला भाविकांचे मृतदेह सापडले तर तिसरी महिला भाविक वाहून गेली. बेपत्ता झालेल्या या महिलेचा शोध घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर येथील चंद्रभागा नदीपात्रात जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील ३ महिला भाविक बुडाल्या. संगीता सपकाळ आणि सुनिता सपकाळ या दोन महिलांचा नदीत बुडून मृत्यू झाला. तर आणखी एका महिलेचा शोध सुरू आहे. चंद्रभागेत स्नान करण्यासाठी या महिला गेल्या होत्या. नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.

भक्त पुंडलिक मंदिराजवळ आज सकाळी ही घटना घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन महिला भाविकांचे मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. तर तिसऱ्या महिलेचा शोध सुरू आहे. या तिन्ही महिला जालन्यातील असून विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरमध्ये आल्या होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता सपकाळ आणि सुनिता सपकाळ या दोन महिला नदीवर स्नान करत असताना बुडू लागल्या त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्यासोबत असलेल्या आणखी एका महिलेने पाण्यात उडी घेतली. पण या महिलेला देखील पाण्याचा अंदाज न आल्याने ती देखील बुडाली. या घटनेत या महिलेचा देखील मृत्यू झाला. तिचा मृतदेह अद्याप सापडला नाही.

दरम्यान, सध्या उजनी धरण ९४ टक्के भरले असल्याने धरणातून भीमा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. पंढरपुरातील चंद्रभागेचे नदीपात्र सध्या भरून वाहत आहे. चंद्रभागेतील मंदिरांना पाण्याने वेढा दिला आहे. खोल पाण्यात महिला भाविक स्नानासाठी गेले असता ही दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे शहराचा पाणी पुरवठा आज विस्कळीत

Horoscope Sunday Update : दवाखाने मागे लागतील, विनाकारण खर्च होईल, वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Politics : आदित्य ठाकरे -फडणवीस भेट ही अफवा... स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं, वाचा

Electrolyte Drink: मधुमेही रुग्णांसाठी इलेक्ट्रोल पावडर योग्य आहे का? जाणून घ्या फायदे-तोटे

Sunday Horoscope : भाग्याला कलाटणी मिळणार, जुन्या गोष्टींमधून फायदा होणार; रविवार ५ राशींच्या लोकांसाठी गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT