Pandharpur Vitthal Mandir : विठुरायाच्या दरबारी १ कोटी रुपयांचा चांदीचा दरवाजा; अहिल्यानगरच्या दोन व्यापाऱ्यांकडून अर्पण

Pandharpur News : राज्यभरातून भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक पंढरपुरात येत असतात. तर आता झालेल्या आषाढी वारीच्या अनुषंगाने लाखो भाविक पंढरपुरात आहेत. वर्षभर भाविकांची हि गर्दी कायम राहते
Pandharpur Vitthal Mandir
Pandharpur Vitthal MandirSaam tv
Published On

पंढरपूर : पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी भाविकांकडून मोठ्या प्रमाणात दान दिले जात असते. नुकताच आषाढी एकादशी झाली असून या काळात मोठ्या प्रमाणात विठुरायाच्या चरणी दान आले आहे. यात अहिल्यानगर येथील दोन व्यापाऱ्यांनी मिळून तब्बल १ कोटी १० लाख रुपयांचा ८७ किलो चांदीचा दरवाजा अर्पण केला आहे. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे दान करण्यात आले आहे. 

राज्यभरातून भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक पंढरपुरात येत असतात. तर आता झालेल्या आषाढी वारीच्या अनुषंगाने लाखो भाविक पंढरपुरात आहेत. वर्षभर भाविकांची हि गर्दी कायम राहते. दर्शनासाठी आल्यानंतर काही भाविक श्रद्धेपोटी दान करत असतात. अशाच प्रकारे अहिल्यानगर येथील दोन भाविकांनी मिळून चांदीचा दरवाजा विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यातील मुख्य दरवाजासाठी दिला आहे. 

Pandharpur Vitthal Mandir
Rain Grant Scam : जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळा; तहसीलदारांसह कर्मचाऱ्यांवर दाखल होणार फौजदारी गुन्हे

उदयपूर येथे तयार करण्यात आला दरवाजा 

विठ्ठल मंदिरातील चौखंबी दरवाजा चांदीने मढवण्यात आला आहे. अहिल्यानगर येथील विठ्ठल भक्त अतुल अशोक पारख आणि गणेश आदिनाथ आव्हाड यांनी स्वखर्चातून देवाच्या चरणी हा चांदीचा दरवाजा अर्पण केला आहे. अत्यंत सुरेख अशी कलाकुसर केलेला दरवाजा राजस्थानातील उदयपूर येथे तयार करण्यात आला आहे. यासाठी तीन महिने कालावधी लागला असून आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी दरवाजा मढविण्यात आला आहे. 

Pandharpur Vitthal Mandir
Shirpur Crime News : दिवसभर सोबत फिरल्यानंतर क्षुल्लक कारणावरून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच केली हत्या

आषाढीवारी काळात १० लाख भाविकांचे विठ्ठल दर्शन
पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी राज्यभरातून सुमारे २० लाखाहून अधिक भाविकांनी हजेरी लावली होती. यामध्ये सुमारे दहा लाख भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्याची मंदिर समितीकडे नोंद झाली आहे.  ४ लाख ५४ हजार भाविकांनी दर्शन रांगेत उभे राहून देवाचे पदस्पर्श दर्शन घेतले. तर ५ लाख ४७ हजार भाविकांनी मुख दर्शन घेतले. अजून ही हजारो भाविक दर्शन‌ रांगेत उभे आहेत. आज गोपाळकाल्याने आषाढीची सांगता होणार आहे. सर्व संतांच्या पालख्या देवाच्या भेटीला जाणार आहेत. संत आणि देव भेटी नंतर दुपारी पालख्या परतीच्या प्रवासाला निघतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com