Rain Grant Scam : जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळा; तहसीलदारांसह कर्मचाऱ्यांवर दाखल होणार फौजदारी गुन्हे

Jalna News : जालना जिल्ह्यात २०२२ ते २०२४ मध्ये अतिवृष्टी, पूर आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून दिलेल्या अनुदान वाटपात गैरव्यवहार झाला
Jalna News
Jalna NewsSaam tv
Published On

अक्षय शिंदे 
जालना
: जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळा चांगलाच गाजर आहे. जालन्यामध्ये शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अनुदानामध्ये तहसीलदाराचे लॉगिन आणि पासवर्डचा गैरवापर करून ५७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तब्बल ३५ कोटींचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. या घोटाळ्याप्रकरणी तहसीलदारांसह ५७ कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे संकेत मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी विधान परिषदेत दिले आहे. 

जालना जिल्ह्यात २०२२ ते २०२४ मध्ये अतिवृष्टी, पूर आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून दिलेल्या अनुदान वाटपात गैरव्यवहार झाला असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या होत्या. या अनुषंगाने जालना जिल्हाधिकारी यांनी एक समिती गठीत नेमून अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील गावांची तपासणी केल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला. यात सुमारे ३५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे.

Jalna News
Heavy Rain : वर्धा, भंडारा, वाशिम जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; महाराष्ट्र- मध्यप्रदेशचा संपर्क तुटला, वर्ध्यातील रस्तेही वाहतुकीसाठी बंद

आतापर्यंत २१ जणांवर निलंबनाची कारवाई  

दरम्यान याप्रकरणी आतापर्यंत जिल्हा प्रशासनाने २१ तलाठी आणि लिपिकांचे निलंबन केले आहे. तसेच ३६ तलाठ्यांवर विभागीय चौकशी प्रस्थापित करण्यात आली आहे. तर दोन तहसीलदारांविरोधात शिस्तभंगाचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आला आहे. अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याची सध्या विभागीय चौकशी सुरु आहे. विभागीय चौकशी पूर्ण झाल्यावर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचे संकेत मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांनी विधानपरिषदेत दिले आहे.

Jalna News
Poshan Aahar : विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ; पौष्टिक चॉकलेटमध्ये आढळल्या अळ्या

शेती नसलेले ६ हजाराहून अधिक खातेदार 

जालना जिल्ह्यात अतिवृष्टी अनुदानामध्ये तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांनी तब्बल ३५ कोटींचा अपहार केला आहे. शेती नसलेले ६ हजार २६९ खातेदार, दुबार खातेदार जवळपास ७ हजार, क्षेत्रवाढ केलेले ६९१ खातेदार, शासकीय जमिनीवर दाखवलेले १७ खातेदार असे एकूण १४ हजार ५४९ खातेदारांना ३४ कोटी ९७ लाख रुपये अतिरिक्त मदत देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com