सिद्धेश म्हात्रे साम टीव्ही, पनवेल
पनवेलमध्ये कोन गावाजवळ जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाल्याचं समोर आलं आहे. कोनगाव ते पळस्पे फाट्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर डंपर पलटी (Traffic Jam On old Mumbai Pune Highway) झाला. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचं दिसत आहे. (Latest Marathi News)
डंपर पलटी झाल्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं समोर आलं आहे. जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ही वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहतूक पोलीस (old Mumbai Pune Highway) घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या वाहतूक नियंत्रण करण्याचे काम सुरू आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सध्या घटनास्थळी वाहतूक पोलीस काही वेळातच ही वाहतूक कोंडी सोडविण्यात येणार आहे. लवकरात लवकर वाहनांना प्रवासासाठी रस्ता खुला करून देण्याचा वाहतुक पोलीस प्रयत्न करत आहे. वाहतूक कोंडीमुळे नागरिक रस्त्यातच (Traffic Jam On Mumbai Pune Highway) अडकून पडले आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. डंपरी महामार्गावर उलटा झाल्यामुळे इतर अनेक वाहने खोळंबली (Panvel Traffic Jam News Update) आहेत.
मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
होळी सणासाठी चाकरमानी कोकणात निघाल्यामुळे २३ मार्च रोजी मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. इंदापूर ते माणगाव दरम्यान ४ ते ५ किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या (Traffic Jam News) होत्या. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते. प्रवासी अर्ध्यातच अडकून पडले होते . महामार्ग चौपदरीकरण अजून पूर्ण झालेलं नाही, त्याचा फटका चाकरमान्यांना बसला होता. महामार्गावर छोट्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या महामार्गावरील वाहतूक कोंडी नेहमीची समस्या बनली आहे. कोकणात जाण्यासाठी हाच प्रमुख मार्ग आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.