An alternate way to reach for Pali Khandoba Yatra 2024  saam tv
महाराष्ट्र

Pali Khandoba Yatra 2024: 'पाल'ची खंडेरायाची यात्रा... २० ते २८ जानेवारी वाहतुकीत माेठा बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Latest Update on Pali Khandoba Yatra 2024: भाविकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे.

Siddharth Latkar

Pali Khandoba Yatra 2024, Satara:

पाल (ता. कराड) येथे श्री खंडोबा देवाची यात्रेसाठी (Pali Khandoba Yatra) महाराष्ट्रातून तसेच शेजारील राज्यातून विविध ठिकाणाहून मोठया प्रमाणात भाविक दर्शनासाठी खाजगी वाहनाने तसेच बसने येत असतात. या यात्रेनमित्त 20 जानेवारीच्या रात्री 10 पासून ते 22 जानेवारीच्या रात्री 10 वाजेपर्यंत पाल गावात येणाऱ्या सर्व वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच २० ते २८ जानेवारी कालावधीत पाल परिसरातील वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे अशी माहिती प्रशासनाने दिली. (Maharashtra News)

पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी काढलेल्या आदेशानूसार काशिळकडून तारळेकडे जाणारी सर्व वाहने निसराळे फाटा- इमरसन कंपनी सासपडे मार्गे तारळेकडे जातील. तारळेकडून काशिळ अथवा कराडकडे जाणारी वाहतुक ही तारळे येथून कोंजावडे फाटा- सासपडे मार्ग खोडद फाटा वरुन कराड कडे जातील. कराड तसेच पाल भागातून तारळे भागात जाण्याकरिता खोडद (ता. सातारा) येथील फाटयावरुन इमरसन कंपनी शेजारुन सासपडे मार्गे तारळेकडे जातील.

दरम्यान या यात्रेसाठी महाराष्ट्रातून तसेच शेजारील राज्यातून विविध ठिकाणाहून मोठया प्रमाणात भाविक दर्शनासाठी खाजगी वाहनाने तसेच एसटी बसने येत असतात. यामुळे पाल गावात व उंब्रज शहरात मोठया प्रमाणात वाहतूकीची कोंडी होत असते. या अनुषंगाने काशिळ ते पाल रोडने येणारी सर्व वाहने आदर्शनगर गावाजवळील तात्पुरते एस. टी. स्टॅन्ड समोर थांबवतील व त्याच्या समोरील शेतात पाकींगची व्यवस्था केली आहे. तेथे वाहने पार्क करावीत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हरपळवाडी ते पाल येणारी सर्व वाहने ही इमरसन कंपनीजवळ थांबवावीत. तेथील शेतात वाहने पार्क करावीत. तारळे - पाल येणारी सर्व वाहने ही तारळे रोडला पाल ग्रामपंचायतीचे नर्सरी समोर रोडवर थांबवावीत व तेथे पार्क करावीत. मरळी ते पाल येणारी सर्व वाहने ही खंडोबा कारखान्यासमोर श्रीकांत शेजवळ यांच्या शेताचे समोर थांबवावीत व त्यांचे शेतात केलेल्या पार्कींगमध्ये पार्क करावीत असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

याबराेबरच वडगांव ते पाल हा सर्व रोड आपत्तकालीन रोड असून त्या रोडवर येणाऱ्या सर्व वाहनांना व वाहने पार्किंग करण्यास बंदी आहे. वडगाव ते इंदोली फाटा जाणाऱ्या रस्त्याशेजारी जाग्यवर पार्कींग करीता बंदी घालण्यात येत आहे.

20 जानेवारीच्या रात्री 10 पासून ते 22 जानेवारीच्या रात्री 10 वाजेपर्यंत पाल गावात येणाऱ्या सर्व वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

SCROLL FOR NEXT