Top 10 Marathi News Headlines top 10 headlines
महाराष्ट्र

Nashik News : नाशिकमध्ये ट्रेनी पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या, वाचा उत्तर महाराष्ट्रातील टॉप १० बातम्या

North Maharashtra News : नाशिकमधील ट्रेनी पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या, कळवण तालुक्यात शरद पवार गटाचे आंदोलन आदी महत्वाच्या घडामोडींसह उत्तर महाराष्ट्रातील टॉप १० बातम्या वाचा.

Nandkumar Joshi

प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकाऱ्यानं मृत्यूला कवटाळलं

नाशिकमध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केलीय. नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीतील घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली. सोमेश्वर गोरे यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून गंगापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कळवणमध्ये शरद पवार गटाचे धरणे आंदोलन

नाशिकच्या कळवण तालुक्यातील प्रशासकीय कार्यालयावर शरद पवार गटाकडून धरणे आंदोलन करण्यात आले. आमदार नितीन पवार आणि त्यांच्या कुटुंबावर केलेल्या खोट्या आरोपांची चौकशी करावी, असे निवेदन यावेळी तहसीलदारांना देण्यात आले.

जुन्या नाशिकमधील रंगपंचमीला परवानगी नाहीच!

जुन्या नाशिकमधील छत्रपती शिवाजी चौकातील रंगपंचमीला पोलिसांनी परवानगी नाकारलीये... नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारलीये. विशेष म्हणजे या चौकातील पेशवेकालीन रहाड रंगपंचमीसाठी तब्बल 61 वर्षांनी उघडण्यात आली.

जनावरांच्या संरक्षणासाठी गोठ्यात फॉगर

जनावरांचा उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नाशिकच्या नांदूर येथील शेतकरी चेतन पुरकर याने शक्कल लढवत गोठ्यात फॉगरचा वापर केला आहे. उष्णतेमुळे दुभत्या जनावरांच्या दुधावर परिणाम होत आहे. प्रत्येक जनावरांसाठी एक फॉगर बसवले असून दिवसभरात तीन वेळेस फॉगरच्या माध्यमातून त्यांना थंड ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

नंदुरबारमध्ये पारा ४० अंशांपर्यंत

नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसपर्यंत गेला आहे. वाढत्या तापमानाचा फळ बागायतदार शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. तापमानात अजून वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसेच एप्रिल आणि मेमध्ये अजून तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

धुळ्यात आंदोलन

धुळ्यात भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं. बौद्धगयामधील महाविरांचं नियंत्रण बौद्धांच्या ताब्यात द्यावं, तसचं जागतिक वारसा अबाधित ठेवण्यासाठी विशेष निधी आणि सुविधा तात्काळ देण्याची मागणी आंदोलकांनी केली.

जळगावात ज्वेलर्समध्ये चोरी

जळगावच्या भडगावात ज्वेलर्सची भिंत फोडून 6 किलो चांदी लंपास करण्यात आली आहे. यामुळे भडगावात कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. दोन दिवसांपासून दुकान बंद असल्याने चोरट्यांनी संधी साधून ही चोरी केली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

२१ दिवसांपासून बेपत्ता व्यापाऱ्याचा मृतदेह आढळला

गेल्या 21 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यापाऱ्याचा मृतदेह सापडल्याने अहिल्यानगरमध्ये खळबळ उडालीय. दीपक परदेशी असं व्यापाऱ्याचं नाव असून त्यांचा खून झालाय. या अपहरण आणि खून प्रकरणात एका निलंबित पोलिसाचा हात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

महापालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच?

राज्यातील महापालिकांच्या निवडणुका ऑक्टोबरनंतरच होण्याची शक्यता आहे. पालिका निवडणुकीसंदर्भात 4 मे रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. कोर्टाने जरी निकाल दिला तरी निवडणुका लवकर घेणं अशक्य असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

कळसूबाई शिखरावर आता रोप वे

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाईवर आता रोप-वे होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळावी या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी अडीचशे कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: या आठवड्यात मोठे खर्च करण्याची तयारी ठेवा; वाचा साप्तहिक राशीभविष्य

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे नवे अध्यक्ष रोहित पवार

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

SCROLL FOR NEXT