Top 10 Headlines : नागपूरमध्ये राडा, मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं; पाहा टॉप १० हेडलाइन्स

Top 10 Headlines in Maharashtra : महाराष्ट्रात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून वाद उफाळला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दांत इशारा दिला आहे. वाचा टॉप १० हेडलाइन्स

मुख्यमंत्र्यांचा इशारा

छावा चित्रपटानंतर लोकांच्या भावना प्रज्वलित झाल्या. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांची हयगय करणार नाही, हल्लेखोरांवर कारवाई होणारच! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहातच ठणकावलं

एकनाथ शिंदे कडाडले

औरंगजेब कुठे, देवेंद्र फडणवीस कुठे, जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर संतापले.

औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला

औरंगजेबाची कबर हटवण्याचा मुद्दा तापला; विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी - विरोधक भिडले, औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त होईल, संजय गायकवाडांचा इशारा.

नागपूर हिंसाचाराचे फुटेज

नागपूर हिंसाचाराचे सीसीटीव्ही फुटेज समोर. पेट्रोल बॉम्ब आणि हातात काठ्या घेत समाजकंटकांकडून गाड्यांची तोडफोड. घरांवरही केला हल्ला.

नागपुरात हिंसाचार, ५० जण ताब्यात

औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरुन नागपुरात हिंसाचार, तोडफोड, जाळपोळीनंतर शहरात तणावपूर्ण शांतता. अनेक भागात संचारबंदी. शाळांना सुट्टी. पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन. 50 जण ताब्यात

संजय राऊतांचं चॅलेंज

हिंदूंना दंगलीसाठी प्रवृत्त करण्याचा नवा पॅटर्न, संजय राऊतांचा घणाघात. मुख्यमंत्री, उपमुख्यमत्र्यांनी कुदळ फावडं घेऊन कबर उखडून टाकावी. संजय राऊतांनी दिलं आव्हान

प्रशांत कोरटकरला दणका

छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता, कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com