Tomato News Saam TV
महाराष्ट्र

Tomato News: टोमॅटोने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणलं पाणी; मातीमोल भाव मिळाल्याने रस्त्यावर कॅरेट केलं रिकामं

Tomato Price Down: टोमॅटोला प्रति किलो 4 ते 5 रुपये भाव मिळतोय. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Ruchika Jadhav

Farmers News:

गेल्या दोन-तीन महिन्यांत टोमॅटोने मोठी उच्चांकी गाठली होती. टोमॅटोचे दर वाढल्याने शेतकरी सुखावला होता. मात्र सर्वसामान्य रडकुंडीला आले होते. अशात सप्टेंबर महिन्यात टोमॅटोचे दर चांगलेच घसरलेत. टोमॅटोला प्रति किलो 4 ते 5 रुपये भाव मिळतोय. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला टोमॅटो फेकून संताप व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

दोन महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांना श्रीमंत कारणाऱ्या टोमॅटोने आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणायला सुरुवात केली आहे. मनमाड बाजार समितीसह किरकोळ बाजारात टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाली आहे. आज टोमॅटोला प्रति किलो ४ ते ५ रुपये इतकाच भाव मिळत आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. सध्या मिळत असलेल्या भावात वाहतुकीचा खर्च देखील निघत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला टोमॅटो फेकून संताप व्यक्त केलाय.

टॉमेटोला पुन्हा मातीमोल भाव

नारायणगाव बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. बाजार समितीत किलोला ४ ते ५ रुपये आणि २० किलोच्या क्रेट ला ६० ते १०० रुपये भाव मिळत आहे. भाव पडल्याने हातात टोमॅटो घेऊन केंद्र आणि राज्य सरकार विरोधात घोषणा देत टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला आहे.

गेल्या एक महिन्याखाली टोमॅटोला उच्चांकी भाव मिळत असल्याने लातूरच्या बोरी येथील शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली. मात्र शेतकऱ्याला लागवडीचा खर्च देखील निघत नसल्याने आणि सध्यस्थितीला बाजारात टोमॅटोला दोन रुपये किलोने भाव मिळत असल्यान संतप्त शेतकऱ्याने लातूरच्या भाजी मंडईत विक्रीसाठी आणलेल्या टोमॅटो रस्त्यावर फेकलाय. तर शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळालाच पाहिजे अशा घोषणा दिल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

रुपाली चाकणकराचं अध्यक्षपद धोक्यात?डॉक्टरचा सीडीआर जाहीर करणं भोवणार?

Jio: धमाकेदार ऑफर, युजर्सला थेट ३५ हजाराचा फायदा, जिओची अनोखी स्किम

SCROLL FOR NEXT