Causes of Inflation : वाढत्या महागाईने सर्वसामान्याच्या खिशाला कात्री बसली आहे. याच्या वाढत्या किंमतीमुळे जीवनावश्यक वस्तूंसाठी देखील कर्ज घ्यावे लागते का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मागच्या महिन्यापासून टोमॅटोच्या कमी पुरवठ्यामुळे त्यांचे दर २०० च्या पुढे गेले आहे. तर दुसरीकडे स्वयंपाकघरातील इतर वस्तूंच्या किंमतीतही प्रचंड वाढ झाली आहे.
अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने या आठवड्यात संसदेत सांगितले की, मागच्या वर्षभरात तूर डाळीच्या किंमतीत २८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचवेळी तांदळाच्या किमती १० टक्क्यांनी अधिक वाढल्या आहेत. उडदाची डाळ आणि पीठ मागच्या वर्षभरात ८ टक्क्यांनी महागले आहे. गुरुवारी तांदळाची सरासरी किरकोळ किंमत 41 रुपये प्रति किलो होती, जी एका वर्षभरापूर्वी 37 रुपये होती.
1. डाळींचे उत्पादन घटले
तूर डाळीच्या किमतीत (Price) वाढ होण्याचे कारण देशांतर्गत उत्पादनातील कमतरता असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. त्यात म्हटले आहे की 2022-23 पीक वर्षासाठी कृषी मंत्रालयाच्या तिसऱ्या आगाऊ अंदाजानुसार, मागील वर्षभरातील पीक 42.2 लाख टनांच्या तुलनेत तूर डाळीचे उत्पादन 34.3 लाख टन इतके आहे. माहिती देताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे (एपीएमसी) सदस्य कौशिक म्हणाले की टोमॅटो (Tomatoes), सिमला मिरची आणि इतर हंगामी भाज्यांच्या विक्रीत मोठी घट झाल्याने भाजीपाला (Vegetables) घाऊक विक्रेत्यांना तोटा सहन करावा लागत आहे.
2. बटाटे 12 टक्क्यांनी स्वस्त
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या किंमत मॉनिटरिंग सेलनुसार, गुरुवारी तूर डाळीची सरासरी किरकोळ किंमत 136 रुपये प्रति किलो होती, जी मागच्या वर्षी 106.5 रुपये प्रति किलो होती. उडीद डाळीचा भाव गेल्या वर्षीच्या १०६.५ रुपयांवरून ११४ रुपये किलो झाला आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की बटाट्याच्या भारतीय सरासरी किरकोळ किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 12 टक्क्यांनी कमी आहेत, तर कांद्याच्या किमती एका वर्षापूर्वीच्या तुलनेत सुमारे 5 टक्क्यांनी जास्त आहेत.
3. किंमत का वाढली?
वाढत्या किमतींबाबत मंत्रालयाने सांगितले की, पिकांच्या हंगामी स्थिती, कोलार हंगामी स्थिती, कोलारमधील पांढरी माशी रोग, देशाच्या उत्तरेकडील भागात पाऊस यामुळे टोमॅटोच्या किमतीवर विपरीत परिणाम झाला आहे. गुरुवारी टोमॅटोचा सरासरी भाव १४० रुपये किलो होता जो मागच्या वर्षी ३४ रुपये इतका होता असे सरासरी आकडेवारीवरुन दिसून येते. सध्या टोमॅटोचा भाव दिल्लीत २५७ रुपये प्रति किलो आहे तर मुंबईत १५७ रुपये किलोने विकला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.