Google Users Alert : गुगलचा युजर्सना झटका! डिसेंबरनंतर या अकाउंटला लागणार टाळे, तुम्ही देखील यात आहात का?

Google Deleting Inactive Account : जर तुमचे खाते २ वर्षांपूर्वीचे असेल व तुम्ही ते सध्या वापर नसाल तर गुगल तुमचे खाते बंद करु शकते.
Google Users Alert
Google Users AlertSaam tv
Published On

How To Know If Your Account Is Active : भारतात लाखो लोक गुगलचे सर्च इंजिन वापरतात. माहिती सर्च करण्यापासून ते इतर अनेक गोष्टीत आपण गुगलचा वापर करतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत गुगल हा आपला सखा-सोबती सारखाचं काम करतो. सध्याच्या ऑनलाइन जगात प्रवेश करताना गुगल हे पहिले नाव येते.

परंतु, सध्या गुगलने आपल्या वापरकर्त्यांना सावध केले आहे. यावर्षी मे मध्ये कंपनीने घोषणा केली की, ३१ डिसेंबरपासून ते अनेक खाती हटवण्याचे काम करणार आहे. यामध्ये जी खाती ही सक्रीय नसतील त्यांचा प्रामुख्याने समावेश असेल. कंपनीचे म्हणणे आहे की, यामुळे हॅकींगचा धोका अधिक प्रमाणात वाढतो आहे. जर तुमचे खाते २ वर्षांपूर्वीचे असेल व तुम्ही ते सध्या वापर नसाल तर गुगल तुमचे खाते बंद करु शकते.

Google Users Alert
WhatsApp Animated Features : व्हॉट्सअ‍ॅपवर अ‍ॅनिमेटेड अवतार पाठवता येणार, जबराट फीचर आलाय...

यासाठी कंपनी (Company) अनेक वापरकर्त्यांना ईमेल पाठवत आहे. ज्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, डिसेंबरपासून ही खाती हटवण्यास सुरुवात करेल. गुगलचे (Google) असे म्हणणे आहे की, कोणतेही खाते बंद करण्यापूर्वी युजर्सना पुनर्प्राप्तीचा रिमाइंडर ईमेल पाठवू शकते.

1. खाते अॅक्टिव्ह कसे ठेवाल?

  • गुगलचे खाते सक्रीय ठेवण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे दर दोन वर्षांनी किमान एकदा लॉग इन करणे.

  • जर मागच्या दोन वर्षात तुम्ही गुगल अकाउंट वापरले असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.

  • याशिवाय खाते सक्रीय (Active) ठेवण्यासाठी तुम्ही ईमेल वाचा किंवा पाठवा. गुगल ड्राइव्ह वापरा, प्ले स्टोरवरुन अॅप्स डाउनलोड करा. गुगल सर्च इंजिनचा वापर करा. युट्यूब, फोटो शेअरिंग व गुगल साइन करा.

Google Users Alert
Indian Railway News : ट्रेनचे सर्व तिकीट बुक झाल्यानंतरही वेटिंगचा पर्याय का येतो? जाणून घ्या रेल्वेचा नियम

2. कंपनीने हा निर्णय का घेतला?

गुगलचे असे म्हणणे आहे की, इनअॅक्टिव्ह असणारी खाती ही जुन्या पासवर्डवर अवलंबून असतात. याच्या न वापरामुळे हॅकर्सद्वारे आपली वैयक्तिक माहिती सहज हॅक करु शकते. असे मत व्यवस्थापनाचे ग्लोबल व्हीपी क्रिचले यांनी मांडले आहे. तसेच यामध्ये टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन नसल्यामुळे देखील ते सहज हॅक करता येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com