Indian Railway News : ट्रेनचे सर्व तिकीट बुक झाल्यानंतरही वेटिंगचा पर्याय का येतो? जाणून घ्या रेल्वेचा नियम

Indian Railway Ticket Rules: तिकीट बुक झाल्यानंतर सर्व सीट्स आरक्षित असतात. मात्र तरीही वेटिंगचे तिकीट का बरे दिले जाते?
Indian Railway News
Indian Railway News Saam Tv
Published On

Update on Indian Railway Rules :

लाखो लोकांच्या कामाची सुरुवात ही ट्रेनने होते. अनेकांच्या खिशाला परवडणारी व सहज-सोपी अशी वाहतुक ती म्हणजे रेल्वे. गावी जाण्यासाठी आपण ट्रेनचे तिकीट बुक करतो.

अनेकदा सुट्टीच्या दिवशी किंवा सणासुदीच्या वेळी ट्रेनमध्ये खूप गर्दी असते. तिकीट बुक झाल्यानंतर सर्व सीट्स आरक्षित असतात. मात्र तरीही वेटिंगचे तिकीट का बरे दिले जाते? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच. प्रवाशांची तिकीटे कन्फर्म होत नाही तरी देखील बुक होतात. असे का? जर ट्रेनच्या सर्व जागा आरक्षित केल्या गेल्या असतील तर तुमचे तिकीट वेटिंग लिस्ट (WL) मध्ये टाकले जाते. म्हणजे तुमचे तिकीट कन्फर्म झालेले नाही. पण जर कन्फर्म तिकीट असलेल्या व्यक्तीने ट्रेन सुटण्यापूर्वी तिकीट रद्द केले तर तुम्हाला ती सीट दिली जाते.

Indian Railway News
Belapur Station : जागा एकच पण रेल्वे स्टेशन दोन, नावही त्यांचे वेगळे

याचा अर्थ जर तुम्‍ही वेटिंग लिस्टमध्ये ३० व्या क्रमांकावर असल्‍यास, तुमच्‍या आधी 29 लोकांना तिकीट रद्द करावे लागेल आणि त्यानंतर तुमचे तिकीट कन्फर्म होईल. रेल्वेच्या (Railway) नियमांनुसार, तुम्ही वेटिंग तिकीट घेऊन प्रवास करू शकत नाही आणि हे तिकीट (Ticket) ट्रेन सुटल्यानंतर काही वेळाने आपोआप रद्द होते. तसेच त्याचा रिफंड देखील आपल्याला मिळतो.

1. वेटिंग लिस्टमध्ये कोणत्या श्रेणीतील तिकीट लवकरच कन्फर्म होईल?

1. WL: अनेक वेळा रेल्वे तिकीट बुक करताना, तुमच्या तिकिटावर वेटिंग लिस्ट (WL) लिहिलेली असते म्हणजे ती प्रतीक्षा यादीची सर्वात सामान्य श्रेणी आहे.

2. RAC: जर तुमचे तिकीट RAC मध्ये असेल तर तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता जास्त असते आणि अशा परिस्थितीत दोन लोकांना एक बर्थ दिला जातो.

Indian Railway News
New Railway Ticket Rule : रेल्वेचा नवा नियम! तिकीट असले तरी भरावा लागू शकतो दंड, प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

3. RWLW : जर तुमचे तिकीट RWLW च्या वेटिंग लिस्टमध्ये असेल, तर तुमचे तिकीट लवकरच कन्फर्म होऊ शकते, कारण हा कोड छोट्या स्टेशनच्या (Station) बर्थसाठी आहे. यामध्ये, GNWL पेक्षा तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता कमी आहे कारण त्यासाठी कोणताही कोटा निश्चित केलेला नाही. या काही स्थानकांदरम्यान तिकीट रद्द केल्यास, तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळू शकते.

4. PQWL: तुम्ही ट्रेनच्या मार्गादरम्यान छोट्या स्थानकांवरून तिकीट घेतल्यास तुम्हाला हे तिकीट मिळेल. समजा तुम्ही दिल्लीतील अलीगढ ते मिर्झापूर ते दिल्ली ते पाटणा ट्रेनचे तिकीट काढले, तर तुम्हाला PQWL मिळाले तर ते कन्फर्म होण्याची शक्यता खूपच कमी आहे.

Indian Railway News
Indian Railway : फक्त 35 पैसे जास्तीचे खर्च करा, होईल10 लाखांचा फायदा; IRCTC वरुन तिकीट बुक करताना या गोष्टी लक्षात ठेवा

5. TQWL : जर तुम्ही तत्काळ मध्ये तिकीट बुक केले असेल तर तुम्हाला हे तिकीट वेटिंग लिस्टमध्ये दिले जाते. तत्काळ तिकिटांसाठी कन्फर्म होण्याची शक्यता खूपच कमी आहे. जर कोणी कन्फर्म केलेले तत्काळ तिकीट रद्द केले तर तुमचे TQWL तिकीट कन्फर्म होऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com