Mumnai News: यावर्षी मान्सूनचे उशिरा आगमन झाले. पाण्याअभावी पिकांचे मोठे नुकसान झाले. आता राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Maharashtra Heavy Rainfall) पडत आहे त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. अशामध्ये बाजारात भाजीपाल्यांची आवक घटली आहे.
आवक कमी झाल्यामुळे भाजीपाल्यांचे दरात कमालीची वाढ झाली आहे. महागाईमुळे (Inflation) त्रस्त झालेल्या नागरिकांच्या खिशाला आता भाज्यांचे दर वाढल्यामुळे ताण येत आहे. अशामध्ये जेवणाची चव वाढवणाऱ्या टोमॅटोने देखील भाव खाल्ला आहे.सध्या टोमॅटो (Tomato Price) पेट्रोलपेक्षाही महाग झाले आहेत.
पेट्रोलच्या दराने सध्या उच्चांक गाठला आहे. टोमॅटोच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. २० रुपये किलोने मिळणारे टोमॅटो आता १४० रुपये प्रतिकिलोने विकले जात आहेत. त्यामुळे टोमॅटो खायचा की नाही असा प्रश्न अनेकांना पडत आहे. बाजारामध्ये भाजीपाला खरेदीला गेलेल्या व्यक्ती टोमॅटोचे दर ऐकूनच ते न घेणं पसंत करत आहेत.
मान्सून जूनच्या अखेरीच राज्यात सक्रीय झाला. तरी देखील राज्यातील अनेक जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस पडत नाहीये. तर दुसरीकडे काही जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे टोमॅटो पिकांचे नुकसान झाले आहे. टोमॅटोचे नुकसान झाल्यामुळे त्याची आवक घटली. याचा पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी बाजारात टोमॅटोचा तुटवडा भासत आहे. त्यामुळेच टोमॅटोच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मुंबईतल्या अनेक ठिकाणी टोमॅटोचे वेगवेगळे दर आहेत. काही ठिकाणी टोमॅटो १४० रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. तर काही ठिकाणी १६० रुपये प्रतिकिलोने विकले जात आहे. येत्या काही दिवसांमध्ये टोमॅटोचे हेच दर २०० रुपयांपर्यंत जाण्याची देखील भिती व्यक्त केली जात आहे. मुंबईत फक्त टोमॅटोच नाही तर इतर भाज्यांचे दर देखील वाढले आहे. हिरव्या मिरच्या २०० ते ३०० रुपये किलोने विकल्या जात आहेत. तर कोथिंबीर २०० ते ३५० रुपये किलोने विकली जात आहे. कोथिंबीरच्या एका जुडीसाठी ८० ते १०० रुपये द्यावे लागत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.