Rohit Pawar on Chagan Bhujbal
Rohit Pawar on Chagan BhujbalSaam TV

Rohit Pawar On Chhagan Bhujbal: ...हेच का आपलं वैचारिक अधिष्ठान?, रोहित पवारांचा छगन भुजबळावर निशाणा

NCP Split news : राष्ट्रवादीच्या फुटीत पुढे असलेल्या छगन भुजबळ यांच्यावर आता रोहित पवारांनी निशाणा साधला आहे.
Published on

Mumbai News : राष्ट्रवादीतील फुटीनंतर आमदार रोहित पवार काहीसे आक्रमक होताना दिसत आहेत.  अजित पवार यांना वगळता इतर नेत्यांवर ते थेट भाष्य करताना दिसत आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीत पुढे असलेल्या छगन भुजबळ यांच्यावर आता रोहित पवारांनी निशाणा साधला आहे.

रोहित पवारांनी ट्वीट करत म्हटलं की, भुजबळ साहेब आयु्ष्यभर जपलेल्या शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेवर केवळ सत्तेसाठी आपण एका क्षणात पाणी सोडलंत. हेच का आपलं वैचारिक अधिष्ठान? तुम्हाला काय कमी केलं होतं? का पत्करली गुलामी? अशी विचारणाही रोहित पवारांनी केली.

रोहित पवारांनी फोटो शेअर करत म्हटलं, भुजबळ साहेब, पवार साहेबांनी नेहमी तुमची काळजी घेतली. एक लढाऊ शिलेदार म्हणून साहेबांचे तुम्ही पाठीराखे होतात. संकटाला न घाबरता तुम्ही जेलमध्ये गेलात. पण अचानक तुम्हाला असे काय झाले की तुमची भाषा १९० अंशात बदलली. साहेबांची साथ तुम्ही सोडली. स्वार्थांच्या आड येणारे सगळे आपल्याला बडवे वाटू लागले. (Political News)

Rohit Pawar on Chagan Bhujbal
Ajit Pawar Group On Sharad Pawar Meeting: शरद पवारांना बैठक बोलवण्याचा अधिकार नाही, अजित पवार गटाचा मोठा दावा

अजून काय पाहिजे? म्हणत राष्ट्रवादीत असताना छगन भुजबळांना शरद पवारांनी कोणत्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या याची यादीत रोहित पवारांनी शेअर केली आहे.

यामध्ये 1991-95 साली महसूल, गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा खात्याचे मंत्री, 1996 साली विधानपरिषद विरोधी पक्षनेता, 1999-2004मध्ये उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, 2004-08मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री, 2008-09 साली दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री, 2009-2014 साली सार्वजनिक बांधकाममंत्री, 2019-22 मध्ये अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री. हे सगळे वाचल्यावर लोक म्हणतील की, असा अन्याय आमच्यावर पण व्हायला पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com