Weather Update Yandex
महाराष्ट्र

Weather Update: विदर्भावर पुन्हा अवकाळीचं संकट; 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता

Todays Weather Update: विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. राज्यात उन्हाचा तडाखा वाढत आहे.

Rohini Gudaghe

Maharashtra Forecast Today

राज्यातील वातावरण सतत बदलत आहे. यावेळी अनेक ठिकाणी सध्या उन्हाचा कडाका जाणवतोय. तर अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागानं दिलेल्या (Forecast) माहितीनुसार, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील काही दिवस ढगाळ वातावरण (Todays Weather Update) राहणार आहे. तर 16 ते 19 मार्च या काळात विदर्भात देखील ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. याशिवाय विदर्भाच्या काही भागामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  (Latest Weather Update)

राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. सकाळी थंडी तर दुपारी उन्हाचा चटका अशी स्थिती अनुभवायला मिळत आहे. यातच आता राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत (Weather Update) आहे. त्यामुळे हवामान विभागाने आजपासून पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विदर्भावर पुन्हा अवकाळीचं संकट

सध्या पश्चिम बंगालपासून आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भाग आणि तामिळनाडू ते विदर्भाच्या काही भागापर्यंत कमी दाबाचा विरळ पट्टा तयार होत आहे. त्यामुळे विदर्भावर पुन्हा अवकाळीचं संकट (Maharashtra Forecast) आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, विदर्भातील भंडारा, अमरावती, नागपूर गोंदिया, तसंच यवतमाळ या जिल्ह्यांत 18 मार्चपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्याचप्रमाणे खान्देशातील काही जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची शक्यता ( Raifall) वर्तवण्यात आलीय. त्यामुळं आता शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे. अगोदरचं अवकाळी पावसामुळं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. उत्तर भारतात मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली (Maharashtra Weather) आहे.

दिल्लीमध्ये किमान तापमानात वाढ होणार

दिल्लीमध्ये आजपासून तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. तापमानाचा पारा 30 अंशांच्या पुढे जाईल, असं हवामान विभागाने सांगितलं आहे. हे वातावरण पुढील काही दिवस कायम राहू शकते, असा अंदाज त्यांनी वर्तविला (Summer Season) आहे. त्याचप्रमाणे किमान तापमानात वाढ होणार आहे. कमाल तापमान 21 मार्चपर्यंत 32 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल, असा अंदाज वर्तविण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी जाणार

Fact Check: सतत नोकरी बदलताय? तर भरावा लागणार लाखो रुपयांचा दंड; व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Maharashtra politics : कोकाटेंचं सेंड ऑफ होणार? अजित पवारांकडून आमदारांसाठी आज स्नेह भोजन

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! इतक्या रुपयांची फक्त एकदाच गुंतवणूक करा अन् दर महिन्याला मिळवा २०,००० रुपये

Success Story: MBBS केलं, नंतर पहिल्याच प्रयत्नात USPC क्रॅक; IPS अधिकाऱ्याची लेक झाली IAS; सौम्या झा यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT