Maharashtra Winter Temprature Update Saam tv
महाराष्ट्र

Today Winter Temprature : राज्यात थंडीचा पारा घसरला! कमाल तापमानात वाढ; कसे असेल आजचे हवामान? जाणून घ्या

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात थंडीची लाट काहीशी कमी झाली असली तरी हुडहुडी कायम आहे. धुळे, निफाड, परभणी येथे ७° च्या आसपास तापमानाची नोंद झाली. सतत बदलत्या हवामानामुळे नागरिक संतप्त झाले आहेत

Alisha Khedekar

  • राज्यात थंडीची लाट काहीशी कमी, पण गारठा कायम

  • धुळे ७°, निफाड ७.३°, परभणी ७.२° सर्वात कमी तापमान

  • किमान तापमानात किंचित वाढीची शक्यता IMDचा अंदाज

  • हवामानातील सतत बदलांमुळे नागरिक संतप्त

महाराष्ट्रात थंडीची लाट काहीशी कमी झाली असली, तरी हुडहुडी कायम आहे. राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरू आहेत. आज किमान तापमानात वाढ होण्याची, मात्र गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सतत बदलत जाणाऱ्या हवामानामुळे नागरिकांमध्ये संताप पाहायला मिळतो आहे.

बुधवारी धुळे येथे ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. निफाड येथे ७.३ अंश सेल्सिअस. परभणी येथे ७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुणे, जेऊर येथे ९ अंश, तर अहिल्यानगर, जळगाव, ‎पुणे, मालेगाव, ‎‎नाशिक आणि गोंदिया येथे १० अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली.

काल म्हणजेच बुधवारी निफाड, धुळे, परभणी येथे थंडीची लाट होती. उर्वरित राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली असली तरी गारठा कायम होता. राज्यातील लाट काहीशी ओसरली असली तरी थंडी कायम राहणार आहे. आज किमान तापमानात काही अंशी वाढ होण्याचा अंदाज आहे. तर कमाल तापमानातील चढ -उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

परभणीत ३६ वर्षात पहिल्यांदा गारठ्याचे प्रमाण जास्त

परभणी जिल्ह्यात यंदा डिसेंबर २०२५ हा महिना आजपर्यंतचा सर्वात थंड महिना म्हणुन नोंद झाली. कारण मागच्या महिना भरापासून तापमान हे १० अंशाखाली गेले आहे.सातत्याने तापमान कधी सात कधी सहा तर कधी ५ अंशापर्यंत कमी झाल्याने, परभणी म्हणजे अक्षरशः थंड प्रदेश असल्यासारखे वातावरण झाले आहे.परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने उपलब्ध असलेल्या १९८९ पासूनचा डाटा तपासला असून यात यंदाचा डिसेंबर महिना हा सर्वाधिक थंड असल्याची नोंदं करण्यात आली.३६ वर्षात पहिल्यांदा असे झाले आहे.

राज्यात कसं आहे हवामान?

पुणे : ९.९

अहिल्यानगर : ९.३

धुळे : ७.०

जळगाव : ९.७

जेऊर : ९.०

कोल्हापूर : १५.३

महाबळेश्वर : १२.०

‎‎नाशिक : ९.५

निफाड : ७.३

रत्नागिरी : १७.१

छत्रपती संभाजीनगर : १२.४

परभणी : ११.०

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सुप्रिया सुळेचा वंचितच्या शहर अध्यक्षांना फोन...

Christmas Celebration : भारतात ख्रिसमस कसा साजरा केला जातो? जाणून घ्या

Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्रीची हत्या, चाकूने सपासप वार करत संपवलं; बॉयफ्रेंडला अटक

Western Railway : पश्चिम रेल्वेवर 'या' दिवशी ३०० लोकल रद्द! नेमकं कारण काय? जाणून घ्या

Cracking knuckles: हाताची बोटं कटकट मोडण्याची सवय आहे; संधिवात होऊ शकतो? डॉक्टरांनी काय सांगितलं? वर्षानुवर्षे मनात असलेला गैरसमज होईल दूर

SCROLL FOR NEXT