राज्यसभा निवडणुकीत ट्विस्ट; बीजेडी आणि काँग्रेसचे 10 आमदार फुटले, राजकारणात खळबळ

Rajya Sabha Election Controversy Explained: ओडिशातील राज्यसभा निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट समोर आला आहे. बीजेडी आणि काँग्रेसच्या जवळपास 10 आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याची माहिती समोर आली असून त्यांनी भाजप समर्थित उमेदवार दिलीप राय यांना पाठिंबा दिला.
Political tension rises in Odisha after several BJD and Congress MLAs allegedly cross-voted in the Rajya Sabha election, supporting BJP-backed candidate Dilip Ray.
Political tension rises in Odisha after several BJD and Congress MLAs allegedly cross-voted in the Rajya Sabha election, supporting BJP-backed candidate Dilip Ray.Saam Tv
Published On

ओडीसामध्ये राज्यसभा निवडणुकीत मोठी उलथापालथ झाली आहे. नवीन पटनायक यांच्या बीजू जनता दल आणि कॉँग्रेसच्या दोन आमदारांनी बंडखोरी केल्याचे सांगितले जात आहे. ओटीव्ही न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, ओडीसाच्या राज्यसभा निवडणुकीत विरोधी पक्षाच्या जवळपास 10 आमदारांनी क्रॉस वोटिंग केले असून यामध्ये 5 बीजू जनता दल आणि कॉँग्रेसच्या 3 आमदारांनी राज्यसभेचे उमेदवार दिलीप राय यांना क्रॉस वोटिंग केली आहे. वृत्तानुसार, काँग्रेसच्या दशरथी गोमांगो, सोफिया फिरदौस, रमेश चंद्र जेना, बीजेडीचे चाकरमणी कन्हार, देवी रंजन त्रिपाठी, सुभाषिनी जेना, सौविक बिस्वाल, नबा मलिक आणि बीजेडीचे निलंबित आमदार नबा किशोर मल्लिक, सनातन महाकुड, अरबिंदा महापात्रा या सर्वांनी बीजेडी-काँग्रेसच्या संयुक्त उमेदवाराच्या विरोधात आणि भाजप समर्थित व्यापारी दिलीप राय यांच्या बाजूने मतदान केले.

Political tension rises in Odisha after several BJD and Congress MLAs allegedly cross-voted in the Rajya Sabha election, supporting BJP-backed candidate Dilip Ray.
ऑफिसमधून घरी आल्यावर पून्हा Mood Refresh कसा कराल? या टिप्स फॉलो करा

ओडिशात राजकीय गोंधळ तीव्र

निवडणुकीत क्रॉस-व्होटिंगचे प्रकार समोर आल्यानंतर सोमवारी ओडिशामध्ये राजकीय खळबळ माजली होती. ज्यामध्ये नेत्यांनी पक्षाच्या निर्णयांविरुद्ध उघडपणे नाराजी व्यक्त केली. बीजेडीच्या आमदार देवी त्रिपाठी यांनी पक्षाच्या विरोधात मतदान केल्याचे आणि दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचे कबूल केल्यावर वाद आणखी वाढला.

Political tension rises in Odisha after several BJD and Congress MLAs allegedly cross-voted in the Rajya Sabha election, supporting BJP-backed candidate Dilip Ray.
Poco X6 Pro 5G ची फिचर्स आहेत गजब; फास्ट चार्जिंग सपोर्टवाला POCOचा फोन कधी येणार बाजारात?

नवीन पटनायक यांनी व्यक्त केली नाराजी

दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या राज्यसभा निवडणुकीत मतदान प्रक्रियेवर बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनायक यांनी जोरदार टीका केली. त्यांनी दावा केला की आमदाराला दुसरी मतपत्रिका देण्यात आली तेव्हा निवडणूक नियमांचे उल्लंघन झाले. पटनायक म्हणाले की, ब्रह्मगिरी विधानसभा मतदारसंघातील एका आमदाराने मतदान करताना चूक केली आणि त्यांना दुसरी मतपत्रिका देण्यात आली तेव्हा मतदान अधिकाऱ्यांनी नियमांविरुद्ध काम केले. ते म्हणाले, ब्रह्मगिरीच्या आमदाराने मतदान करताना स्पष्टपणे चूक केली. परंतु मतदान कक्षात बसलेल्या अधिकाऱ्याने, जो या कामाची जबाबदारी होता, त्याने तिचे मत बेकायदेशीरपणे स्वीकारले आणि तिला दुसरी मतपत्रिका दिली. हे पूर्णपणे लोकशाही नियमांविरुद्ध आणि निवडणूक नियमांचे उल्लंघन आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com