Tiger News  Saam tv
महाराष्ट्र

चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू; वाघांच्या वाढत्या संख्येमुळे नवं संकट?

chandrapur news : राज्यातील वाघांची वाढती संख्या आता माणसांच्या जीवावर उठू लागलीये की काय? असा प्रश्न पडलाय... चंद्रपुरात एकाच वाघाच्या हल्ल्यात तब्बल चार महिलांचा मृत्यू झालाय. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष कसा उफाळून आलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Saam Tv

रोहित कदम, साम टीव्ही

राज्यात वाघांची वाढत चाललेली संख्या आता नागरिकांच्या जीवावर उठू लागलीय की काय असा प्रश्न निर्माण झालाय. कारण चंद्रपूरच्या सिंदेवाहीत एका वाघाच्या हल्ल्यात तब्बल चार महिलांचा मृत्यू झालाय. वाघाच्या हल्ल्यात एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येनं मृत्यू होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे. नेमकं काय घडलं ते पाहूयात...

13 महिला सिंदेवाहीतील जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी सोबत गेल्या होत्या. तेंदूपत्ता तोडण्याचं काम सुरू असतानाच या महिलांवर वाघाने अचानक हल्ला चढवला. अचानक झालेल्या वाघाच्या हल्ल्यामुळे त्या महिला घाबरल्या आणि सैरावैरा पळत सुटल्या. तेंदूपत्ता तोडायला गेलेल्या 13 महिलांपैकी एक महिला भीतीने घटनास्थळावरुन ओरडत गावात आली. तिने आरडाओरड करत गावकऱ्यांना गोळा केलं आणि वाघाच्या हल्ल्याची माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी पोहोचताच तिथे चार महिलांचे मृतदेह आढळून आले.

चंद्रपुरात जंगलालगतच्या गावांमध्ये मानव-वन्यजीव संघर्ष वाढतच चाललाय. विशेषतः तेंदूपत्ता हंगामात वाघांच्या हल्ल्यांच्या घटना अधिक प्रमाणात होत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे राज्य सरकारनं यासंदर्भात कठोर पावलं उचलण्याची मागणी पर्यावरणवादी संस्थेनं केलीये.

एकीकडे राज्यात वाढलेल्या बिबट्यांच्या संख्य़ेवर नियंत्रण मिळवण्याची मागणी होत असताना आता वाघांच्या हल्ल्यांचा मुद्याही ऐरणीवर आलाय. त्यामुळे वन खात्यानं यावर दीर्घकालीन धोरण राबवण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT