TRAGIC RATNAGIRI INCIDENT: THREE FAMILY MEMBERS DROWN IN NAGZARI RIVER saam tv
महाराष्ट्र

हृदयद्रावक! पाण्याचा अंदाज चुकला अन्...; नागझरी नदीत बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Ratnagiri Three Family Members Drowned: रत्नागिरी जिल्ह्यातील नागझरी नदीत तीनजण बुडल्याची घटना घडली आहे. एकाच परिवारातील तिघांचा मृत्यू झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे.

Bharat Jadhav

  • रत्नागिरीच्या नागझरी नदीत तिघांचा बुडून मृत्यू झाला.

  • मृतांमध्ये १५ वर्षीय मुलीचा समावेश आहे.

  • पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने दुर्घटना घडली.

अमोल कलये, साम प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या धामणंद काजूफाटा येथे हृदयदावक घटना घडली आहे. धामणंद काजूफाटा येथील नागझरी नदीच्या पात्रात एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेत एका १५ वर्षीय मुलीसह गुहागर तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, हे तिघेही नदीत पोहण्यासाठी गेले होते.

लावण्या विजय पार्टे (वय १५, रा. साखर चौकीचीवाडी, ता. खेड), नितीन सूर्यकांत जाधव (वय ३८, रा. गिमवी, ता. गुहागर) आणि विराज किशोर जाधव (वय १२, रा. गिमवी, ता. गुहागर) अशी मृतांची नावे आहेत. आज सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हे तिघे धामणंद काजूफाटा परिसरातील नागझरी नदीत पोहण्यासाठी गेले.

मात्र त्यांना नदीच्या पात्रातील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अचूक अंदाज आला नाही. तिघेही पाण्यात बुडू लागले. दरम्यान ही बाब स्थानिकांच्या निर्दशनात आली. त्यांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यांना वाचवण्यात नागरिकांना यश आले नाही.

या घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी अरुण गोपाळ पार्टे यांनी खेड पोलीस ठाण्यात याप्रकरणी माहिती दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यू क्रमांक ३७/२०२६ प्रमाणे बी.एन.एस.एस. कलम १९४ अंतर्गत नोंद केली आहे. पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.या घटनेमुळे धामणंद, साखर चौकीचीवाडी आणि गिमवी परिसरात शोककळा पसरली आहे.

टेंभापुरी धरणात तिघांचा बुडून मृत्यू

काही दिवसापूर्वी वाळूज जवळील टेंभापुरी मध्यम प्रकल्प परिसरातील अवैध मुरूम उत्खननामुळे तयार झालेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून ३ तरुणांचा मृत्यू झाला. ही १ मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या ही दुर्घटना घडली होती. या धरणात आणि परिसरातील खड्ड्यांत बुडून वर्षभरात तब्बल नऊ जणांचा बळी गेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: - नवी मुंबई विमानतळावर मराठी उद्घोषणा नाही; मनसेचे इंडिगो कार्यालयासमोर आंदोलन

Pregnancy Planning Tips: लवकरच मिळेल गूड न्यूज! बाळासाठी प्रयत्न करताना महिलांनी 'या' १० टिप्स ठेवाव्यात लक्षात

ITR Filing Mistakes: आयटीआर फाइल करताना 'या' चुका कधीच करु नका, अन्यथा भरावा लागेल दंड

Team India squad : कसोटी, वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; उपकर्णधार बदलला, कुणाला मिळाली संधी?

उल्हासनगरात 'लव्ह जिहाद'चा प्रकार; खोटी ओळख सांगत हिंदू तरुणीची फसवणूक

SCROLL FOR NEXT