मुंबई : माझगाव सत्र न्यायालयाने करुणा मुंडे यांना मोठा दिलासा दिला आहे. माझगाव कोर्टाने वांद्रे कुटुंब न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे. तसेच माजी मंत्री धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळली आहे. या निकालावर करुणा मु्ंडे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. 'आज सत्याचा विजय झाला. महिलांसाठी प्रेरणा देणारा हा निकाल आहे. आज ही सातवी वेळ आहे, धनंजय मुंडे तोंडावर पडले आहेत. महिला या खूप भीतीत असतात. महिलांना अबलाच्या दुष्टीने पाहिलं जातं. महिलाही स्वत:ला अबला नारी समजतात. मी देखील मीडियासमोर रडायला लागते. पण आम्ही मनात ठरवलं तर समोर मंत्री असूद्या किंवा कोणीही असूद्या. तुम्ही खरे असाल तर तुम्ही कुणाचाही पराभव करु शकता. तुम्ही खरे आहात तर लढा, तुमचा विजय निश्चित होईल. करुणा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे हे प्रकरण भारतातील महिलांसाठी प्रेरणा देणारं ठरेल', असं करुणा मुंडे म्हणाल्या.
'वांद्रे कुटुंब कोर्टाने २ लाख रुपये पोटगी देण्याचा निर्णय दिला होता. पण धनंजय मुंडे यांनी त्याविरोधात माझगाव सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. करुणा मुंडे या आपल्या पत्नी नाहीत. आपण त्यांना पोटगी देऊ शकत नाही, असं याचिकेत म्हटलं होतं. ही याचिका न्यायाधीशांनी फेटाळली आहे. मी माझ्या याचिकेत स्पष्टपणे म्हटलं आहे की, मी धनंजय मुंडे यांची १९९८ पासूनची पहिली पत्नी आहे. त्यासाठी मी पोटगी मागितली आहे. मी २७ वर्ष धनंजय मुंडे यांच्या करियरसाठी दिले आहेत. त्यांची मुलं माझ्याकडे आहेत. त्यामुळे माझा पोटगीसाठी हक्क आहे, असंही त्या म्हणाल्या आहेत.
'मला मेसेज येत आहेत की, तुझ्या मुलीला आम्ही उचलून घेऊन जाणार आहोत. तू धनंजय मुंडे यांच्या विरोधात तोंड उघडलं, तू कोर्टात गेली, पुरावे सादर केले तर आम्ही तुझ्या मुलीला उचलून घेऊन जाणार, असा आरोप त्यांनी केलाय. तू एका बापाची औलाद आहे तर माझ्या मुलीला उचलून दाखव. मला षडयंत्रात गुंतवण्यासाठी कट कारस्थान रचत आहेत. बीडचे एसपी काँवत यांना मी पूर्ण पुरावे दिले आहेत. त्यांना मी पूर्ण चॅटचे पुरावे दिले आहेत. त्यांनी मला लिखित स्वरुपात तक्रार द्या. मी त्यांच्यावर कारवाई करतो, असं म्हटलं आहे, अशी माहिती करुणा मुंडे यांनी दिली.
'वकील वकिलांचं काम करत असतात. त्यांनी त्यांची बाजू मांडली. पण न्यायाधीशांनी आम्हाला कागदपत्रांसाठी वेळ दिला. मी इंदोरला गेले. तिथूनही दस्तावेज आणले. लग्नाचे दस्तावेज शोधले. परळी पोलीस ठाण्यातही काही दस्तावेज आहेत. माझे लग्नाचे फोटो देखील आहेत. ते सर्व घेऊन मी माध्यमांवर शेअर करणार आहे', असा इशारा करुणा शर्मा यांनी दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.