Manoj Jarange Patil Latest News  Saam TV
महाराष्ट्र

Maratha Reservation : कोणताही तोडगा निघालेला नाही, सरकार दिशाभूल करतंय; मनोज जरांगे आंदोलनावर ठाम

Manoj Jarange on Maratha Reservation : मनोज जरांगे यांनी म्हटलं की, आधी नोंदी मिळालेल्या मराठ्यांना प्रमाणपत्र द्या. सगेसोयरे व्याख्या अजून स्पष्ट झालेली नाही. जे सांगितले ते काही टाकतात आणि काही टाकत नाही.

डाॅ. माधव सावरगावे

Chhatrapati Sambhajinagar News :

मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांनी मुंबईतील आंदोनलाच्या तयारीसाठी घेतलेली येत्या २० जानेवारीला संपत आहे. त्याआधी सरकारकडून मनोज जरांगे यांनी मनधरणी करण्यात यश येताना दिसत नाही. बच्चू कडू यांनी तोडगा निघाल्याचा दावा केला होता. मात्र स्वत: मनोज जरांगे यांनी हा दावा खोडून काढला आहे.

मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत बच्चू कडू यांचा दावा खोडून काढला आहे. कोणताही तोडगा निघाला नाही, नुसती चर्चा सुरू आहे, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं होतं. चार महिन्यांपासून जी चर्चा सुरू आहे, तीच चर्चा अजूनही सुरू आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आधी नोंदी मिळालेल्या मराठ्यांना प्रमाणपत्र द्या. सगेसोयरे व्याख्या स्पष्ट झालेली नाही. जे सांगितले ते काही टाकतात आणि काही टाकत नाही. सरकार तोडगा निघाला म्हणून दिशाभूल करत आहे. मी मरेपर्यंत मागे हटणार नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

आज पुन्हा सरकारी शिष्टमंडळासोबत चर्चा

२० जानेवारीची डेडलाईन जवळ येत आहे, तसं सरकारडून हालचालींना वेग वाढला आहे. सरकारकडून मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा सुरुच आहेत. आज देखील ४ वाजता पुन्हा सरकारचे शिष्टमंडळ येणार आहे. मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे आणि आमदार बच्चू कडू येणार आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत काय चर्चा होते आणि तोडगा निघतो का याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरी गणरायाचे उत्साहात आगमन; गणपतीसमोर साकारला कृषीचा खास देखावा

Skin Care: चेहऱ्याची काळजी घेताना नकळत करता 'या' चुका करू नका; हळू हूळ चेहरा पडेल काळा आणि डल

High Court : विद्यार्थ्यांना दिलासा! शाळा सोडल्यानंतरही दाखल्यातील चूक दुरुस्त होणार, हायकोर्टाचा मोठा निर्णय

Ramayan Jai Jai Ram Song: गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर 'रामायण'ची खास भेट; रणबीर-साई पल्लवीचं 'जय जय राम' गाणं रिलीज

Fitness Test : तुम्ही खरंच फिट आहात का? फक्त ३० सेकंदांत कळंल, जिमचीही गरज नाही

SCROLL FOR NEXT