Rajan Salvi News: ठाकरे गटाच्या बड्या नेत्याला अटक होणार? उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढण्याची शक्यता

Mla Rajan Salvi News: राजकीय वर्तुळातून मोठं वृत्त हाती आलं आहे. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आमदार साळवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अटकेची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Rajan Salvi News
Rajan Salvi NewsSaam tv

Mla Rajan Salvi Latest News:

राजकीय वर्तुळातून मोठं वृत्त हाती आलं आहे. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्याविरुद्ध बेकायदा संपत्ती जमा केल्याचा आरोपांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. आमदार साळवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अटकेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे राजन साळवी यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांची गर्दी झाली आहे. राजन साळवी यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याने उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढणार असल्याचं बोललं जात आहे. (Latest Marathi News)

आमदार राजन साळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राजन साळवी यांच्याकडे उत्पन्नापेक्षा 118% संपत्ती जास्त असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दाखल केलेल्या एफआयरमध्ये स्वतः राजन साळवी, त्यांची पत्नी आणि मुलाचा समावेश आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Rajan Salvi News
Maharashtra Politics: ठाकरे गटावर नवं संकट, आमदार अपात्रता निकालानंतर आणखी एक धक्का बसणार?

राजन साळवी यांच्या विरोधात गुन्हा पोलिसांत दाखल झाल्यानंतर राजन साळवी अटकपूर्व जाण्यासाठी अर्ज करणार नसल्याचीही माहिती समोर आली आहे. साळवी यांच्या अटकेच्या शक्यतेमुळे त्यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांची गर्दी जमा झाली आहे. राजन साळवी यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी कार्यकर्ते जमले असल्याचे सांगण्यात येत आहे.

Rajan Salvi News
Maratha Reservation : कोणताही तोडगा निघालेला नाही, सरकार दिशाभूल करतंय; मनोज जरांगे आंदोलनावर ठाम

राजन साळवींच्या घरी एसीबीसीची धाड

१३ जानेवारीला राजन साळवी रायगड लाचलुचतपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात गेले होते. त्यानंतर त्यांनी एसीबीला सहकार्य करणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली होती. आज गुरुवारी पुन्हा एकदा घरी धाड मारली होती. आज सकाळपासून साळवी यांच्या घरी चौकशी सुरु होती.

राजन साळवी यांच्या घरावरील धाडसत्रावर विनायक राऊतांची प्रतिक्रिया

खासदार विनायक राऊत म्हणाले, राजन साळवी यांच्या राजकीय सूडबु्द्धीने त्यांच्या घरी धाड टाकण्यात आली आहे. एसीबीने धाड टाकून त्यांना अडकविण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याचा आम्ही धिक्कार करतो. शिंदे गटात सामील झाले नसल्याने त्रास द्यायचा काम सुरु आहे.

'कितीही त्रास दिला तरी ठाकरेंची साथ सोडणार नाही, असं ठणकावून सांगणारे राजन साळवी आहेत. आम्ही त्यांच्या पाठिशी आहे, खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com