Ramdas Athawale: राहुल गांधींना पंतप्रधान होण्याची घाई, पण मोदी असेपर्यंत...; रामदास आठवले यांनी स्पष्टच सांगितलं

Ramdas Athawale News: राहुल गांधी यांना प्रधानमंत्री होण्याची घाई आहे. पण मोदी असेपर्यंत ते प्रधानमंत्री होणार नाही, अशा शब्दांत रामदास आठवलेंनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
Ramdas Athawale
Ramdas AthawaleSaam TV

संजय सूर्यवंशी

Ramdas Athawale On Rahul Gandhi:

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सध्या सर्वच पक्ष कामाला लागलेत. राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेनंतर भारत जोडो न्याय यात्रेला सुरूवात केली आहे. अशात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांना प्रधानमंत्री होण्याची घाई आहे. पण मोदी असेपर्यंत ते प्रधानमंत्री होणार नाही, अशा शब्दांत रामदास आठवलेंनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधी यांना पंतप्रधान होण्याची घाई आहे. त्यामूळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भारत जोडो यात्रा काढली. पण जोपर्यंत मोदी आहेत तोपर्यंत राहुल गांधी पंतप्रधान होणार नाही. असं केंद्रिय मंत्री रामदास आठवले म्हणाले.

Ramdas Athawale
Rahul Narvekar News: मी दिलेल्या निर्णयात चूक दाखवा! नार्वेकरांचा आरोप करणाऱ्यांवर पलटवार

उध्दव ठाकरे यांच्या महापत्रकार परिषदेवर देखील रामदास आठवले यांनी टीका केली. उध्दव ठाकरे यांचे नेहमी महामेळावे, महासभा, महापत्रकार परिषदा असतात असं रामदास आठवले म्हणाले.

येत्या 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदीराच्या उद्घाटनाला विरोधकांनी पण यावे. ज्यांना निमंत्रण आहे त्यांनी जावं, राजकारण करू नये असंही रामदास आठवले म्हणाले. आरपीआयचा अध्यक्ष म्हणुन मला निमंत्रण आहे मी जाणार आहे, असं त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलंय.

काँगेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी यांना पण निमंत्रण आहे त्यांनी पण जावं. त्यांनी बहिष्कार घातला तर जनतेने त्यांच्यावर बहिष्कार टाकावा, अशी टीका आठवलेंनी काँग्रेसवर केली आहे.

२ जागा आरपीआयला देण्याची मागणी

लोकसभेच्या राज्यातील ४८ जागांपैकी २ जागा आरपीआयला देण्याची मागणी आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा , गृहमंत्री अमित शहा , मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे देखील आपण तशी मागणी केली . शिर्डी आणि सोलापूर किंवा विदर्भातील एक जागा द्यावी. शिर्डीतून आपण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे रामदास आठवले म्हणाले.

Ramdas Athawale
Buldhana News : बुलढाण्यात उपक्रम, कारसेवक वडीलांच्या स्मृतीप्रित्यर्थ २ लाख २१ हजार दिव्यांचे वाटप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com