Satara MP Udayanraje Bhosale May Get Cabinet Minister Post Saam TV
महाराष्ट्र

Udayanraje Bhosale News: छत्रपती उदयनराजेंच्या गळ्यात केंद्रीय मंत्रिपदाची माळ पडणार? आज रात्रीच दिल्लीला रवाना होणार

Udayanraje Bhosale Will Leave For Delhi: साताऱ्याचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले यांना केंद्रातून कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती साम टिव्हीला सूत्रांनी दिली आहे. यासाठी उदयनराजे भोसले दिल्लीला रवाना होणार आहे.

ओंकार कदम

सातारा : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत प्राप्त झालं. त्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. केंद्रात भाजपने नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांच्या पक्षाच्या मदतीने सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे केंद्रात नव्या सरकारमध्ये मंत्रिपदाची कोण शपथविधी घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. याचदरम्यान, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना केंद्रातून कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपने २४० जागा जिंकल्या. तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने २९३ जागा जिंकल्या. त्यानतंर राष्ट्रीय लोकशाही आघीडीने केंद्रात सत्तास्थापनासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. नव्या सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात कोणते खासदार असणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

याचदरम्यान, साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना केंद्रीय मंत्रिपद मिळणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये उदयनराजेंना कॅबिनेट मंत्रिपद देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

उदयनराजे यांना मंत्रिपद देऊन पश्चिम महाराष्ट्रात भाजप स्वत:चे पाय आणखी मजबूत करण्यासाठी दिल्लीमध्ये हालचाली सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्यात प्रथमच भाजपचा खासदार निवडून आला आहे. त्यामळे उदयनराजेंच्या नावाची दिल्लीत जोरदार चर्चा आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांचा ८ जूनला शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर मंत्र्यांचा देखील दिवशी शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाच्या वाटेला एक मंत्रिपद तर शिंदे गटाच्या वाटेला एक राज्यमंत्री आणि एक कॅबिनेटपद येण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT