Beed News विनोद जिरे
महाराष्ट्र

लग्नाळू तरुणांवर लुटारू नवरी मुलीचा डोळा; दोन लाख मिळताच ठोकली धूम

बीडच्या तळनेवाडी गावातील धक्कादायक घटनेने जिल्ह्यात खळबळ...

विनोद जिरे

बीड - राज्यात लुटारू नवरीच्या एक ना अनेक घटना समोर येत असतानाच, त्यातच आता बीडच्या (Beed) गेवराई तालुक्यात पुन्हा एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पहिले दोन अपत्य असताना देखील एका तरुणीने लग्नाळू तरुणासोबत 2 लाख रुपयांसाठी लग्न केलं आणि दोन लाख रुपये मिळाले असता लग्नाच्या दहाव्या दिवशी लुटारू नवरीने तेथून धूम ठोकली.

बीडच्या गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथील, कृष्णा फरताळे, या लग्नाळू तरुणासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सालवडगावच्या, रामकिसन जगन्नाथ तापडीया या एजंटने रेखा चौधरीचे स्थळ आणले होते. यावेळी लुटारू नवरी मुलगी रेखा चौधरी व इतर चार जणांनी 2 लाख देत असाल तर लग्न करू असं फरताळे कुटुंबियांना म्हणाले. ही अट मान्य करत, फरताळे यांनी, रेखा चौधरी हिच्यासह इतर मंडळींना रोख 60 हजार व 1 लाख 40 हजाराचा चेक दिला. त्यानंतर गेवराईच्या बोरीपिंपळगाव फाट्यावरील एका मंगल कार्यालयात त्यांचा लग्न समारंभ देखील पार पडला.

हे देखील पहा -

या दरम्यान दिलेला चेक आठ दिवसांत विड्राल होताच, लुटारू नवरी रेखा माहेरी गेली. मात्र त्यानंतर नवरदेव कृष्णा तिला आणायला गेला, मात्र तिने पहिल्यांदा कोरोना झाला आहे, असं कारण दिलं. तर पुन्हा आणायला गेला तर त्याला, एक ना अनेक कारण देत ती परत आलीचं नाही. त्यानंतर काही दिवसांनी तिचा मोबाईल बंद झाला.

विशेष म्हणजे या दरम्यान नवरा मुलगा तिला आणायला गेल्यानंतर, तिचा आठ वर्षापूर्वी काकासाहेब भाऊसाहेब पठाडे या व्यक्तीशी विवाह झाला असून त्यांना 2 अपत्य देखील असल्याचे कळल्याने त्यांना धक्काच बसला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलीचे स्थळ आणलेले रामकिसन जगन्नाथ तापडीया यांना संपर्क साधला. मात्र त्याने "तुम्हाला काय करायचे ते करा , कोठे फिर्याद द्यायची ती द्या" म्हणत फोन कट केला.

त्यामुळं आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानं, नवरदेव मुलगा कृष्णा फरताळे याच्या फिर्यादीवरून संतोष विश्वनाथ शिंदे, सुनिता बाळू चौधरी, रेखा बाळू चौधरी, रामकिसन जगन्नाथ तापडीया व विठ्ठल किसन पवार या पाच जणांविरुद्ध बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. कुणाची फसवणूक झाली असेल तर समोर येऊन तक्रार द्यावी. असे आवाहन प्रभारी पोलिस अधीक्षक सुनील पवार यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Transfer: महापालिका निवडणुकीआधीच बड्या IAS अधिकाऱ्याची बदली, अविनाश ढाकणे BMC चे नवे अतिरिक्त आयुक्त

Maharashtra Politics : भाजपचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; चव्हाणांकडून बालेकिल्ल्याला खिंडार, VIDEO

Shocking: सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या, नव्या घरात घेतला गळफास; १० पानी सुसाईड नोटमध्ये लिहिलं धक्कादायक कारण...

Vladimir Putin: परम बलशाली पुतीनची महिला ब्रिगेड, रशियातील 10 शक्तीशाली महिला

MahaYuti Face Clash: महायुतीत वाहताहेत स्वबळाचे वारे; निवडणुकीआधी भाजप-सेना युती तुटणार?

SCROLL FOR NEXT