कुंभार घाट दुर्घटना प्रकरणी विदर्भातील भाजप आमदाराचे पंढरपुरात उपोषण

जो पर्यंत मृतांच्या नातेवाईकांना न्याय मिळत नाही तो पर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा ही आमदार पिंगळे यांनी दिला आहे.
Pandharpur News Updates, Kumbhar Ghat accident News, Harish Pimpale News
Pandharpur News Updates, Kumbhar Ghat accident News, Harish Pimpale NewsSaam Tv
Published On

पंढरपूर - पंढरपूर येथील कुंभार घाट दुर्घटना प्रकरणी जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता जयंत शिंदे व कार्यकारी अभियंता रमेश वाडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी विदर्भातील मूर्तीजापूरचे भाजप आमदार हरिष पिंगळे यांनी पंढरपुरातील प्रांताधिकारी कार्यलयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. जो पर्यंत मृतांच्या नातेवाईकांना न्याय मिळत नाही तो पर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा ही आमदार पिंगळे यांनी दिला आहे. (Pandharpur News Updates)

भाजप आमदाराने सुरु केलेल्या बेमुदत उपोषणामुळे येथील निकृष्ठ घाट बांधकामाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत चंद्रभागातीरावर घाटांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यातील बहुतांश कामे रखडली आहेत. येथील कुंभार घाटाजवळ नवीन घाटाचे काम सुरु असताना 2020 मध्ये घाटाची भिंत कोसळून अपघात झाला होता. यामध्ये स्थानिक चार जणांसह एकूण सहा जणांचा बळी गेला होता.

घाटाचे काम निकृष्ठ झाल्यानेच अपघात झाला आहे, असा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी व स्थानिक नागरिकांनी केला आहे. येथील दुर्घटने नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळाला भेट देवून पाहाणी केली होती. त्यावेळी पवार यांनी या दुर्घटनेसे जबाबदार असलेल्या अधिकारी व ठेकेदारांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. परंतु दोन वर्षानंतर ही संबंधीत अधिकारी व ठेकेदारांची साधी चौकशी सुध्दा झाली नाही. महाविकास आघाडीचे सरकार अशा अधिकारी व ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप आमदार पिंगळे यांनी केला आहे. त्या विरोधात त्यांनी‌ बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com