The procession of son in law on a donkey see tradition of vadangali village अभिजीत सोनावणे
महाराष्ट्र

Nashik: ऐकावे ते नवलच! प्लॉट पाहायला गेला अन् निघाली गाढवावरून धिंड...

Nashik News: या गोष्टीचा फायदा घेत शिवसेना जिल्हा उपप्रमुख दीपक खुळे यांनी भ्रमणध्वनीवर त्यांना संपर्क करत हिवरगाव शिवारात प्लॉट विक्रीसाठी पाहायला या असा बनाव केला.

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक

वंडांगळी,नाशिक: सुपाचे बाशिंग, लसणाच्या मुंडावळ्या, गळ्यात कांदा आणि फाटक्या चपलांचा हार अन् सोबतीला गाढवावरून धिंड... हे दृष्य आहे नाशिक जिल्ह्यातील वडांगळी गावचं. विशेष म्हणजे गाढवावर धिंड (Procession on a Donkey) काढली जाते ती व्यक्ती कोणी साधीसुधी नाही, तर ते या गावचे जावई (Son-in-law) आहेत. तुम्ही म्हणाल हा काय प्रकार? पण हो तुम्ही वाचताय ते खरं आहे. सिन्नर (Sinnar) तालुक्यातील वंडागळी (Vadangli) येथे जावयाची गाढवावर बसवून धिंड काढण्याची परंपरा आहे. शिमग्याच्या सणास जावयाची गाढवावर बसवून धिंड काढण्याची प्रथा वडांगळीकर गेल्या पावणे दोनशे वर्षांपासून जोपासत आहे. (The procession of son in law on a donkey see tradition of vadangali village)

हे देखील पहा -

यंदाच्या वर्षीही ही परंपरा टिकविण्यासाठी युवकांची धडपड सुरु होती. सहजासहजी जावई मिळणे अतिशय मुश्कील, तरीही हार मानतील ते वडांगळीकर कसले?... मात्र जावई शोधाबरोबरच गाढवाचाही शोध घेण्याचं आव्हान युवकांपुढं होतं. पण युवकांनी दोन्ही मोहिम फत्ते केल्या. बाळासाहेब यादव खुळे यांचे जावई दौलत बाजीराव भंबारे हे नाशिक (Nashik) इथं खासगी कंपनीत नोकरीला आहे. त्यांना सिन्नर तालुक्यात प्लॉट खरेदी करायचा असल्याचा मानस यांनी यापूर्वी व्यक्त केला होता.

या गोष्टीचा फायदा घेत शिवसेना जिल्हा उपप्रमुख दीपक खुळे यांनी भ्रमणध्वनीवर त्यांना संपर्क करत हिवरगाव शिवारात प्लॉट विक्रीसाठी पाहायला या असा बनाव केला. भंबारे यांनीही प्लॉट बघावयाची तयारी दाखवली. पण ते प्लॉट बघायला गेले आणि घात झाला. सुरूवातीला त्यांच्या मेव्हण्यांनी त्यांना विनंती केली, प्रारंभी ते तयार नव्हते पण त्यांचाही नाईलाज झाला.आणि जावई सापडला पण गाढवाचं काय? अखेर निफाड इथून गाढवही आणलं गेलं. अनं शेवटी धिंडीची परंपरा पार पडली.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

SCROLL FOR NEXT