'जयंत पाटलांच्या 'त्या' वक्तव्याने हिंदूंचा अपमान; त्यांनी माफी मागावी अन्यथा...'

काश्मिरी निर्वासित हिंदू भिकारी नाहीत, जयंत पाटलांनी ते मूर्खपणाचे आणि विकृत विधान केलं आहे.
Jayant Patil On The Kashmir Files
Jayant Patil On The Kashmir FilesSaam TV
Published On

मुंबई : सध्या चर्चेत असलेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपदाचे पडसाद काल विधानसभेत उमटले. कामकाज सोडून विरोधक चित्रपट बघायला गेल्याच्या सत्ताधाऱ्यांच्या आक्षेपावर 'हो मी काल चित्रपट बघायला गेलो होतो,' असं उत्तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले. दरम्यान याच चित्रपटाच्या अनुषंगाने बोलताना जयंत पाटील म्हणाले, हा चित्रपट मध्यंतरानंतर फारच कंटाळवाणा आहे. पण, या चित्रपटाने भरपूर गल्ला कमवलाय. त्यामुळे चित्रपट दिग्दर्शकाला त्यातील काही पैसे काश्मिरी पंडितांच्या घरासाठी दान करायला असं वक्तव्य जलसंपदा मंत्री राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते जयंत पाटलांनी (Jayant Patil) केलं होतं.

त्यांच्या याच वक्तव्यावरुन हिंदू महासंघाचे आनंद दवे (Anand Dave) यांनी जयंत पाटलांनी माफी मागावी असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. दवे म्हणाले, काश्मिरी निर्वासित हिंदू भिकारी नाहीत जयंत पाटील साहेब निर्मात्यांनी त्यांचा नफा पंडितांना हिंदूंना दान करावा अस मूर्ख पणाचे विकृत विधान काल जयंत पाटील यांनी केलं आहे. आम्ही या विधानाचा आणि जयंत पाटील यांचे सुद्धा निषेध करतो त्यांनी माफी मागून आपले शब्द मागे घ्यावेत असंही ते म्हणाले आहेत.

Jayant Patil On The Kashmir Files
'एक पुतिन दिल्लीत बसलेत, एक पुन्हा येईल'; मोदी, फडणवीसांचं नावं न घेता राऊतांची टीका (पहा Video)

आज पर्यंत काश्मिरी हिंदूंनी (Kashmiri Hindu) कोणत्याही सरकार कडे काहीही मागितलं नाही. त्यांच्या मागण्यांचे पत्र आम्ही आणी पनून काश्मीरने प्रकाशित पण केलेल आहे. तर केवळ आमच्या घरी पाठवा आणि सुरक्षिततेची काळजी घ्या; एवढीच साधी अपेक्षा यांनी व्यक्त केली असताना त्यांना मदत ऐवजी 'दान' हा शब्द वापरणे हा याच नव्हे तर देशातील हिंदूंचा अपमान आहे असं आम्ही मानतो येणाऱ्या काळात हिंदू आपल्या मतांचे दान करताना आपलं हे विधान लक्षात ठेवतील याची आम्ही काळजी घेऊ असा इशाराच त्यांनी जयंत पाटलांना दिला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com