'एक पुतिन दिल्लीत बसलेत, एक पुन्हा येईल'; मोदी, फडणवीसांचं नावं न घेता राऊतांची टीका (पहा Video)

देशाचं वातावरण बदललंय 'पुन्हा येईल वाले' संध्याकाळी इथे येणार आहेत, पुढच्या वर्षी या कार्यक्रमात देखील मी येईल.
Sanjay Raut/ Narendra Modi
Sanjay Raut/ Narendra ModiSaam TV

नागपूर : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सध्या शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी नागपूर दौऱ्यावर आहेत आज ते नागपूरातील एका वृत्तपत्राने आयोजित केलेल्या पत्रकारिता पुरस्कार वितरण समारंभ सोहळ्याला गेले होते. यावेळी बोलताना राऊत यांनी नावं न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवरती टीका केली.

ते या कार्यक्रमात बोलताना म्हणाले, 'आमच्यासारखे लोक रोज युद्धाचा अनुभव घेत आहोत (मोदींचा उल्लेख पुतिन म्हणून) एक पुतिन दिल्लीत बसलेत. ते आमच्यावर रोज मिसाईल सोडतायत. ईडीच्या माध्यमातून मात्र, त्यातून आम्ही वाचलोय असं म्हणत त्यांनी मोदींवरती निशाना साधला. तसंच देशाचं वातावरण बदललंय पुन्हा येईल ( फडणवीसांना टोला ) वाले संध्याकाळी इथे येणार आहे. तेव्हीही मी येईल. पुढच्या वर्षी या कार्यक्रमात देखील येईल असं म्हणत त्यांनी फडणवीसांवरती मिश्किल टिप्पणी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली.

दरम्यान याच कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) देखील हजेरी लावली होती त्यावेळी फडणवीसांनी त्यांच्यावरती झालेल्या आरोपांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, सुडाने कारवाईचा आरोप केला जात आहे मी यासंदर्भात एवढेच सांगेल की, माननीय आमचे नेते मोदीजी कधीच सुडाच राजकारण करत नाही. त्यामुळे किमान सध्यातरी कुठले सेंट्रल एजन्सी सूडाच्या भावनेने काम करेल अस वाटत नाही.

मात्र त्याच वेळी या नेत्यांनी महाराष्ट्रातली परिस्थिती बघितली पाहिजे कशाप्रकारे प्रवीण दरेकरांवर कारवाई झाली आहे. कशाप्रकारे आमच्या सगळ्यांच्या विरुद्ध षडयंत्र यांचे वकील मंत्र्यांसोबत बसून तयार करतात आहे. मला असे वाटते की केंद्र सरकार (Central Government) असेल किंवा राज्य सरकार असेल कोणीही कुठलीही चुकीची कारवाई करू नये. योग्य ती कारवाई झाली पाहिजे मी पुन्हा विश्वासाने सांगतो मोदींच्या राज्यात चुकीचे कारवाई होऊ शकत नाही असं फडणवीस म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com