चिंताजनक! जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाखांच्या वर...  Saam Tv
महाराष्ट्र

चिंताजनक! जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाखांच्या वर...

संपूर्ण जगाला वेठीस धरलेल्या कोरोना विषाणूचा फटका सोलापूर शहर- ग्रामीणला देखील बसला आहे

विश्वभूषण लिमये

सोलापूर : संपूर्ण जगाला वेठीस धरलेल्या कोरोना विषाणूचा फटका सोलापूर शहर- ग्रामीणला देखील बसला आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटेत शहर आणि ग्रामीण मधील २ लाख २०३ व्यक्‍तींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील ४ हजार ९६६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या शहरातील २२ तर ग्रामीण मधील १ हजार ४१५ रुग्णांवर उपचार सुरु असून उर्वरित सर्व रुग्ण कोरोनामुक्‍त झाले आहेत.

हे देखील पहा-

सोलापूर शहरातील पाच्छा पेठेत १२ एप्रिलला पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ग्रामीण मध्ये दिलासादायक स्थिती होती. मात्र, त्याचवेळी मृत्यूदरात सोलापूर शहर देशातील पहिल्या ५ जिल्ह्यांमध्ये होते. दुसऱ्या लाटेत मात्र, शहराच्या तुलनेत ग्रामीण मधील परिस्थिती बिकट झाली होती. रुग्णवाढ आणि मृत्यूदरात सोलापूर ग्रामीण देशातील टॉपटेन जिल्ह्यांमध्ये पोहचले.

आता शहरातील कोरोनाची स्थिती सुधारली असून ग्रामीणमध्ये अजूनही अपेक्षित यश मिळालेले नाही. दरम्यान, आता तिसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविली जात आहे. दोन्ही लाटेत हॉटस्पॉट ठरलेले तालुके आणि शहरातील त्या प्रभागांकडे प्रशासनाने आवर्जुन लक्ष देणे गरजेचे आहे. बार्शी, माढा, माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला या तालुक्‍यांसह शहरातील २६ पैकी ९ प्रभागांमधील उपाययोजनांकडे आरोग्य यंत्रणेने वेळीच लक्ष द्यायला हवे.

ऑक्‍सिजन बेड वेळेत मिळाला नाही, रेमडेसिव्हिरचा तुटवडा, असे भरपूर अनुभव प्रशासनाच्या पाठिशी आहेत. तिसऱ्या लाटेत चिमुकल्यांना धोका असल्याचा अंदाज असल्याने त्यांच्यासाठी लागणारी वैद्यकीय उपकरणांची सोय करून ठेवावी लागणार आहे. तिसऱ्या लाटेपूर्वी दोन्ही लाटेतील त्रुटी दूर करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

Dheeraj Deshmukh: लातूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, धीरज देशमुख यांचा पराभव

Vastu Tips : घराची तोडफोड न करताही दूर होऊ शकतो वास्तूदोष, जाणून घ्या सोपे उपाय

Maharashtra Election Result : बविआचा बालेकिल्ल्यातच भाजपकडून सुपडासाफ; हितेंद्र ठाकूर-क्षितीज ठाकूर पराभूत

SCROLL FOR NEXT