'बघा मी किती साधेपणा जपलाय'; भर कार्यक्रम दानवेंनी दाखवला फाटलेला शर्ट

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे ज्या ठिकाणी जातात त्याठिकाणी जुन्या आठवणींना उजाळा देत एक रंजक किस्से सांगत असतात
'बघा मी किती साधेपणा जपलाय'; भर कार्यक्रम दानवेंनी दाखवला फाटलेला शर्ट
'बघा मी किती साधेपणा जपलाय'; भर कार्यक्रम दानवेंनी दाखवला फाटलेला शर्टSaam Tv

पुणे : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे ज्या ठिकाणी जातात त्याठिकाणी जुन्या आठवणींना उजाळा देत एक रंजक किस्से सांगत असतात. यामुळे त्यांच्या भाषणांना अलोट गर्दी लोटते. पुण्यात देखील त्यांनी त्यांच्या पहिल्या निवडणुकीचा किस्सा सांगितला आहे. त्यांना लोकांनी साडे ३ लाखांच्या मताधिक्क्याने कसे निवडून दिले याचे गुपितच सांगितले आहे. रावसाहेब दानवे पुण्यात होते.

एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी निवडणुकी मधील विजयाचा किस्साच सांगितला आहे. निवडणुकीत दरम्यान आजारी असताना मी साडे ३ लाखाच्या फरकाने निवडून आलो. निवडून आल्यावर मी विजयाचा प्रमाणपत्रंच घ्यायला गेलो होतो. यावेळी अर्जुन खोतकर आणि बबनराव लोणीकर सोबत होते. मला एवढे मोठे मताधिक्य पडल्याने लोणीकरांना मोठा प्रश्न पडला आहे.

हे देखील पहा-

एकही सभा न घेता दानवे एवढ्या फरकाने कसे निवडून आले? असा सवाल लोणीकरांनी खोतकरांना केला होता. त्यावर, लोकांना वाटले असेल हा खूप सीरियस असेल. शेवटचे मत देऊन टाकावे. म्हणून निवडून आले असतील, असे खोतकरांनी सांगितले आहे. दानवे यांनी हा किस्सा ऐकवताच उपस्थितांमध्ये मोठ्या प्रमाणात हशा पिकला. तो इतका की दानवेंनाही हसू अवरेनासे झाले होते.

अन् फाटका शर्टच दाखवला

त्यावेळी दानवेंनी आणखी एक किस्सा सांगितला आहे. हा किस्सा सांगताना त्यांनी त्यांचा फाटका शर्टच उपस्थितांना दाखवला आहे. मी केंद्रात ४ वेळेस मंत्री झालो आणि महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष राहिलो आहे. पण मी साधेपणा कधी सोडला नाही. काल मी हैदराबादला एका मित्राकडे गेलो होतो. मोठा माणूस आहे. तो म्हणाला, दादा तुम्ही खादीचं शर्ट घ्या. मी म्हणालो, का? त्यावर तो म्हणाला, तुमचं शर्ट फाटलंय, असे सांगत असतानाच आता तुमच्या पैकी कोणी फाटलेलं शर्ट घालून बसलंय का? घरातून निघताना तुमच्या पत्नीने सांगितले तुमचे शर्ट फाटलेलं आहे.

'बघा मी किती साधेपणा जपलाय'; भर कार्यक्रम दानवेंनी दाखवला फाटलेला शर्ट
सांगलीच्या बाळू लोखंडे याची लोखंडी खुर्ची इंग्लंडच्या हॉटेलात गमतीदार व्हिडीओ होतोय व्हायरल

असा आहे का कोणी माणूस इथं बसलेला? असा सवाल दानवेंनी उपस्थितांना केला आहे. बरे एवढं सांगून थांबतील ते दानवे कसले? त्यांनी भर सभेत थेट आपला फाटलेला शर्टच दाखवले आहे. हे बघा माझं शर्ट फाटलेलं आहे. याला आम आदमी म्हणतात. लोकं म्हणतात आपल्यासारखाच दिसतो, आपल्यासारखाच बोलतो आणि आपल्या सारखाच राहतो. ह्यो असला काय आणि दुसरा असला काय फरक पडतो आपल्याला. म्हणूनच लोकं मला एवढ्या वेळा निवडून देतात, असे ते म्हणाले आहे. यावर परत एकदा उपस्थितांमध्ये हस्याचे फव्वारे मोठ्या प्रमाणात उडाले होते.

सध्या पेट्रोल भाव हे 100 पार झाल्याने आता ई- बाईकच परवडत आहे. इंधनाचे भाव हे आता आंतरराष्ट्रीय बाजारातून ठरतात आणि हे धोरण मोदींनी नाहीतर काँग्रेस सरकारने ठरवले आहे. हे ग्राहकांनी लक्षात घ्यावे, असे ते म्हणाले. ई बाईकवरचा जीएसटी केंद्राने कमी केला आहे. ई बाईकला सायलन्सरच नाही. यामुळे गाडीचा आवाजच येत नाही. त्यामुळे तरूणाईमध्ये ई बाईकची क्रेझ कमी आहे. म्हणून या बाईकही आवाज मारतील असे काहीतरी करा, असा भन्नाट सल्लाही दानवेंनी दिला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com