गळा दाबून 13 वर्षीय चिमुकल्याचा खून, निर्दयी बाप जेरबंद; गाव हळहळले Saam TV
महाराष्ट्र

गळा दाबून 13 वर्षीय चिमुकल्याचा खून, निर्दयी बाप जेरबंद; गाव हळहळले

आज सकाळी सिध्देश्वर त्याची 5 वर्षीय मुलगी जान्हवी, 13 वर्षीय मुलगा अमर , पत्नी रत्नमाला गाढ झोपेत असताना ...

संजय जाधव

बुलडाणा : आईच्या कुशीत साखरझोपेत असलेल्या चिमुकल्यास शौचास जायचे म्हणून उठवून नेत घरा जवळ असलेल्या नदीपात्रात निर्दयतेने गळा दाबून खून करून मृतदेह नदीत फेकून दिल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील सवडद येथील अपंग युवक सिध्देश्वर सखाराम नन्हई 40 हा दररोज दाऊ पिऊन पत्नी व मुलांना त्रास द्यायचा ऐवढेच नाही तर गावातील लोकांना सुद्धा त्रास द्यायचा. दरम्यान एक महिन्या पासून तो साखरखेर्डा येथे भाड्याच्या जागेत राहायचा. मात्र चार दिवसांपासून तो पुन्हा सवडद मध्ये माळीपुरा येथे राहायला आला होता. मात्र त्याच्या वागणूकीत कोठेही बदल झाला नाही.

आज सकाळी सिध्देश्वर त्याची 5 वर्षीय मुलगी जान्हवी, 13 वर्षीय मुलगा अमर , पत्नी रत्नमाला गाढ झोपेत असताना सकाळी चारच्या सुमारास त्याने आईच्या कुशीत झोपलेल्या अमरला शौचास जायचे म्हणून सोबत घेऊन गेला. घराबाहेर पडल्यावर त्याचा गळा दाबला असता चिमुकल्या अमरने आर्त किंकाळी ठोकली दरम्यान आजूबाजूला कुणीही नसल्याने त्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र क्रुर पित्याने त्याला कडेवर घेऊन त्याचा गळा आवळून कोराडी नदीच्या पात्रात बुडवून निर्दयीपणे खून केला.

त्यानंतर सिध्देश्वर हा मी माझ्या मुलाला मारल्याचे गावात जाहिरपणे सांगत असताना घरी अमर नसल्याने खरोखर अमरचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान गावकऱ्यांनी सिध्देश्वर यास पोलीसांच्या हवाली करून मृतदेह नेमका कोठे टाकला याची माहिती घेऊन कोराडी नदीपात्रातील नाल्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, आरोपी सिध्देश्वर नन्हई यास पोलिसांनी अटक केली आहे. चिमुकल्याचा मृतदेह उत्तर तपासणीसाठी अकोला येथे पाठविण्यात आला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Bigg Boss 19'च्या सदस्याने नॅशनल TVवर दिली प्रेमाची कबुली; गुडघ्यावर बसून केला प्रपोज, पाहा रोमँटिक VIDEO

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! ठाण्यावरून थेट गेट वे ऑफ इंडियाला जा, तयार होतोय नवा भुयारी मेट्रो मार्ग; सर्वाधिक फायदा कुणाला?

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल

Jio Recharge Plan: कमी खर्चात जास्त सुविधा! जिओचा 70 दिवसांचा धमाकेदार रिचार्ज प्लॅन, वाचा फायदे

Bhoplyachi Bhaji Recipe : गरमागरम वडे अन् भोपळ्याच्या भाजी, संडे स्पेशल चटपटीत बेत

SCROLL FOR NEXT