सांगलीत आत्महत्येचे सत्र; कुपवाडमध्ये प्रेमी युगलाची गळफास घेवून आत्महत्या

घटनास्थळी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस सहायक निरीक्षक अविनाश पाटील घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
सांगलीत आत्महत्येचे सत्र; कुपवाडमध्ये प्रेमी युगलाची गळफास घेवून आत्महत्या
सांगलीत आत्महत्येचे सत्र; कुपवाडमध्ये प्रेमी युगलाची गळफास घेवून आत्महत्याSaam TV

सांगली : सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील मणेराजुरी सावर्डे येथील 3 प्रेमीयुगलाची आत्महत्या पाठोपाठ आता कुपवाड मध्ये एका प्रेमी युगुलानी आत्महत्या केली आहे. कुपवाड-बुधगाव रस्त्यावरील शेतात या प्रेमी युगुलांनी विषारी औषध प्राशन करून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कुपवाड पासून 1 किलोमीटर अंतरावर सुनील नाद्रेकर यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये विषारी औषध प्राशन करून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

सांगलीत आत्महत्येचे सत्र; कुपवाडमध्ये प्रेमी युगलाची गळफास घेवून आत्महत्या
लुधियाना बॉम्बस्फोटात खलिस्तानी गटाचा हात; ISI पाकिस्तानचीही मदत, असे होते नेटवर्क

मयत राजू महादेव माळी वय 36 राहणार कुपवाड आणि रीना किरण पार्लेकर वय 33 राहणार वखार भाग मिरज हे दोघे कुपवाड एमआईडीसी येथील इंडिया गारमेंट या कंपनीत काम करत होते, या दोघांनी विषारी औषध प्राशन करून गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस सहायक निरीक्षक अविनाश पाटील घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com