Dhule accident  Saam TV
महाराष्ट्र

Dhule Accident : शिरपूर पुलावरील भीषण अपघाताचं कारण आलं समोर; नदीत पडलेला ट्रक अद्याप सापडेना

या भीषण अपघाताचं नेमकं कारण काय याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

भूषण अहिरे

Dhule Accident Update : शिरपूर येथील सावर्दे पुलावर रात्रीच्या सुमारास ट्रक व क्रुझरचा भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रक हा पुलाचा कथडा तोडून थेट नदीपात्रात कोसळला आहे. 12 तास उलटून गेले असले तरीही ट्रकचा अद्याप सापडलेला नाही. मात्र, आता या भीषण अपघाताचं नेमकं कारण काय याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

या अपघातानंतर (Accident) संबंधित प्रशासनाचा दुर्लक्षितपणा उघडकीस आला आहे. या अपघातापासून हाकेच्या अंतरावर पुलाचे काम सुरू असून हे काम जवळपास 15 ते 20 दिवसांपासून रखडले असल्यानेच हा अपघात झाला असल्याचा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला आहे. टोल प्रशासनातर्फे पुलावर हा खड्डा करण्यात आलेला असून या खड्ड्याचे गेल्या कित्येक दिवसांपासून कामच पूर्ण झाले नसल्याची बाब उघडकीस आली आहे.

ज्या ठिकाणी रात्री अपघात झाला तेथून जवळपास 50 ते 60 मीटर अंतरावर हा खड्डा असून या खड्ड्यामुळे पुलावरून जाणाऱ्या वाहनांना मोठी कसरत करावी लागते. यामुळेच रात्रीच्या वेळी हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

महत्त्वाची कागदपत्र पोलिसांच्या हाती

 बुडालेल्या ट्रक संदर्भात महत्त्वपूर्ण कागदपत्र पोलिसांच्या हाती लागले आहेत. कागदपत्रांमधील माहितीनुसार, ट्रकचालकाचं नाव दीपक कुमार (वय 40) असून तो राजस्थानच्या कोटा येथील आहे. ट्रक चालकाचं ड्रायव्हिंग लायसन्स पोलिसांच्या हाती लागलं आहे.  

शिरपूर सावर्दे पुलावर सोमवारी रात्री क्रुझर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला होता. या अपघातात 20 ते 25 जखमी झाले आहेत. त्यापैकी किरकोळ जखमी असलेल्यांना प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले असून अद्यापही चार जण जखमी असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर पुलाचा कठडा तोडून ट्रक नदीपात्रात कोसळला. बुडालेला ट्रक अद्यापही नदीपात्रातच आहे.यामध्ये ट्रक चालकासह आणखी किती जण आहेत याचा अद्यापही अंदाज लागू शकलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चौकशी पूर्वीच राणा सूर्यवंशी ने रुग्णालयातून ठोकली धूम

Dalimb Benefits: रोज १ वाटी डाळिंब खा; हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत शरीराला मिळतील ७ आरोग्यदायी फायदे

अंत्यसंस्कारावरून परतताना बस अन् ट्रकचा भीषण अपघात; 22 जणांचा मृत्यू, पाहा काळीज पिळवून टाकणारा VIDEO

किचनमध्ये कोणत्या दिशेला RO लावावं? दिशा चुकली तर होईल दुर्दशा

140KM वेगाचं भयानक 'अर्णब' चक्रीवादळ घडवणार विध्वंस; किनारपट्टीवरील राज्यांना अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT