Pune News: क्षुल्लक कारणावरून तरुणाने केला हवेत गोळीबार; पुण्यातील खळबळजनक घटना

येरवडा पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
Pune News
Pune NewsSaam TV
Published On: 

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

Pune News: पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ब्रह्मा सनसिटी परिसरात दोन गटांमध्ये मोठा राडा झाला आहे. या घटनेत बाचाबाची झाल्याने एका तरुणाने हवेत गोळीबार केला. सध्या या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिस पुढील चौकशी करत आहेत. (Pune Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, शेकोटी पेटवण्याच्या किरोकोळ कारणावरून हा वाद झाल्याचे समजले आहे. या भांडणात एका तरुणाला दुखापत देखील झाली आहे. येरवडा पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

वडगाव शेरी जवळील ब्रह्मा सनसिटी या ठिकाणी असलेल्या अर्नोल्ड स्कूल समोर सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी दोन तक्रारी दाखल करण्याचे काम सुरू होते. सदर हल्ल्यात अमित सिंह हा तरुण जखमी झाला आहे.

Pune News
Pune Crime News : धावत्या PMPML बसमध्ये महिलेसमोरच प्रवाशाचे घाणेरडं कृत्य, पुण्यातील संतापजनक घटना

येरवडा पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ब्रह्मा सनसिटीजवळ असलेल्या अर्नोल्ड स्कूलजवळ सागर गायकवाड, अक्षय खामकर, रोहित क्षत्रिय, रोहित जेधिया, सिद्धार्थ शिंदे आदी तरुण शेकोटी करत बसले होते. त्या ठिकाणी अमित सिंह आला. त्यानंतर शेकोटी पेटवण्यावरून त्यांच्यामध्ये बाचाबाची सुरू झाली. या वादातून अमित सिंह याची गाडी फोडण्यात आली.

Pune News
Pune Crime News : स्टेटस ठेवताना काळजी घ्या! पुण्यात ९ तरुणांवर गुन्हा दाखल

चिडलेल्या अमितने त्याच्याकडील पिस्तुलामधून हवेमध्ये गोळीबार केला. त्यानंतर या तरुणांनी अमितला बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दोन्ही बाजूने एकमेकांच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com