Municipal Election Result saam tv
महाराष्ट्र

Municipal Election Result: मुंबईवर भाजपचाच झेंडा, राज्यात 25 ठिकाणी सत्ता, महापालिका विजयानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. मुंबईत भाजपचा झेंडा फडकला असून राज्यातील २५ महानगरपालिका आणि नगरपरिषदांमध्ये पक्ष सत्तेत आला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

राज्यात जवळपास 29 महापालिकांचा निकाल आता स्पष्ट होताना दिसतोय. महापालिकांमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारल्याचं चित्र आहे. याशिवाय मुंबई महापालिकेवर भाजपा आणि एकनाथ शिंदे यांनी महायुतीचा झेंडा फडकवलाय. या मोठ्या विजयानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे आभार मानलेत.

फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, जनतेने विकासाच्या अजेंड्याला साथ दिली आहे. लोकांना प्रामाणिकता आणि विकास हवा आहे म्हणून त्यांनी महायुतीला निवडून दिलंय. महाराष्ट्राचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आहे आणि त्याच विश्वासामुळे भाजप आणि महायुतीला विजय मिळाला आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

महापालिका निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या विजयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले. ते म्हणाले की, भाजपने यावेळी सर्व रेकॉर्ड मोडले असून २९ महापालिकांपैकी २५ ठिकाणी महायुतीने सत्ता मिळवली आहे. मुंबई महापालिकेवरही महायुतीचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री म्हणाले की, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आशिर्वाद आमच्यावर असल्याने हा विजय शक्य झाला आहे. आमचा अजेंडा हा मुळात विकास असून आम्ही व्यापक हिंदुत्व मानणारे आहोत. निवडून आलेल्या सदस्यांनी जबाबदारीने वागावं, उन्माद टाळावा आणि जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ नये याची काळजी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केले.

फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना विजयाचा आनंद साजरा करताना संयम राखण्याचं आवाहन केलं आणि पुढील काळात विकासाच्या माध्यमातून जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्याचे आश्वासन दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर सेनेच्या कार्यालयावर अज्ञातांचा हल्ला; उद्धव ठाकरेंचा बॅनर फाडला

Maharashtra Elections Result Live Update: महाराष्ट्रात पुन्हा एकदा ठाकरे राज्य येणार-शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

Mumbai : मुलं घरात राहून कंटाळी? मग वीकेंडला मुंबईतील 'या' ठिकाणी करा पिकनिक प्लान

मुंबईसह महाराष्ट्राच्या निवडणुकीचा साम टीव्हीचा एक्झिट पोल ठरला तंतोतंत खरा

Navi Mumbai: नवी मुंबई महापालिकेचा निकाल लागताच दोन मोठे निर्णय; बिल्डरांचे धाबे दणदणार

SCROLL FOR NEXT