

दिल्लीतील वजीराबाद भागात लिव्ह-इन पार्टनरवर हल्ला
महिलेने लिव्ह इन पार्टनरचे गुप्तांग कापले
दुधातून गुंगीचे औषध देऊन मध्यरात्री हल्ला केला
जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करून शस्त्रक्रिया करण्यात आली
दिल्लीमध्ये एका महिलेने लिव्ह इन पार्टरनचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीच्या वजीराबादमध्ये ही घटना घडली. लिव्ह इन पार्टनरने दुसरं लग्न केल्यामुळे महिलेला प्रचंड राग आला होता. या रागाच्या भरात तिने त्याच्यासोबत भयंकर कृत्य केले. या हल्ल्यात जखमी झालेला तरुण स्वत: रुग्णालयात गेला. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय पीडित तरुण बनावट डॉक्टर असून तो क्लिनिक चालवतो. त्याची दोन वर्षांपूर्वी दोन मुलांची आई असलेल्या शायरासोबत ओळख झाली. त्यानंतर दोघे वझिराबादमध्ये लिव्ह इन पार्टनर म्हणून एकत्र राहू लागले. शायरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असताना देखील तरुणाने दुसरीसोबत लग्न केले त्यामुळे शायरा नाराज झाली.
बुधवारी पीडित तरुण तिला भेटण्यासाठी आला होता. महिलेने दुधामध्ये गुंगीचे औषध मिक्स करून त्याला प्यायला दिलं. तरुण बेशुद्ध झाल्यानंतर मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास महिलेने धारदार शस्त्राच्या सहाय्याने त्याच्या गुप्तांगावर हल्ला करत ते कापले. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. हल्ल्यानंतर महिला पळून गेली. त्यानंतर जखमी झालेला तरुण स्वत: रुग्णालयात गेला. त्याठिकाणी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याला पुढील उपचारासाठी सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आले.
याप्रकरणी पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पीडित तरुणाचा जबाब नोंदवून घेतला. पोलिसांनी पीडित तरुण बनावट डॉक्टर असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या दिल्ली पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल करत तिचा शोध सुरू केला आहे. आरोपी महिलेच्या शोधासाठी पथकं तयार केली आहे. बिहारमधील कटिहार येथे पोलिसांचे पथक रवाना झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.